CBSE exam Result esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE SSC HSC Result : महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के, तर बारावीत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी अचानकपणे जाहीर करण्यात आला. यात दहावीचे ९३.६० टक्के, तर बारावीमधील ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सीबीएसईच्या दोन्ही परीक्षांच्या निकालात किंचित वाढ झाली आहे.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात ०.४८ टक्क्यांनी, तर बारावीच्या निकालात ०.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात या दोन्ही परीक्षांच्या निकालात विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. दहावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.७५ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.७१ टक्के आहे. तर बारावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.५२ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.१२ टक्के आहे.

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेसाठी देशभरातील २५ हजार ७२४ शाळांमधील २२ लाख ५१ हजार ८१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २२ लाख ३८ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यातील २० लाख ९५ हजार ४६७ विद्यार्थी (९३.६० टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या ४७ हजार ९८३ विद्यार्थ्यांना ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण, तर दोन लाख १२ हजार ३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

तर सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेसाठी देशातील १८ हजार ४१७ शाळांमधून १६ लाख ३३ हजार ७३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख २१ हजार २२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील १४ लाख २६ हजार ४२० विद्यार्थी (८७.९८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या २४ हजार ६८ विद्यार्थ्यांना ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, तर एक लाख १६ हजार १४५ विद्यार्थ्यांना ९० टक्के आणि त्यापेक्षा जास्त टक्के मिळाले आहेत.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या निकालाची आकडेवारी -

परीक्षा : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी

दहावी : १,०७,८३३ : १,०७,६५५ : १,०३,९१६ : ९६.५३ टक्के

बारावी : ३२,५६१ : ३२,३४६ : २९,०३६ : ८९.७७ टक्के

पुणे विभागातील निकालाचा तपशील -

परीक्षा : नोंदणी केलेले विद्यार्थी : परीक्षा दिलेले विद्यार्थी : उत्तीर्ण विद्यार्थी : उत्तीर्णतेची टक्केवारी

दहावी : १,१०,६८५ : १,१०,४९८ : १,०६,५८५ : ९६.४६ टक्के

बारावी : ३४,७१५ : ३४,४९४ : ३०,९६९ : ८९.७८ टक्के

(पुणे विभाग : महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण, दादरा आणि नगर हवेली)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT