केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) वाढल्यानंतर त्यांच्या घरभाडे भत्तावाढीला ग्रहण लागू शकते.
सोलापूर : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) (DA) वाढल्यानंतर त्यांच्या घरभाडे भत्तावाढीला (House rent allowance) (HRA) ग्रहण लागू शकते. यापूर्वी डीए वाढवल्यानंतर मोदी सरकारने त्यांच्या एचआरएमध्येही बदल केले आहेत, परंतु ऑगस्टच्या पगारामध्ये एचआरए वाढेल की नाही याबद्दल शंका आहे. सरकारने आधी म्हटले होते, की एचआरए यासाठी वाढवले होते कारण डीए 25 टक्क्यांपेक्षा वर गेला आहे. (Central employees' salaries will not be increased from August-ssd73)
आता काय होईल?
एचआरए न वाढण्याचे कारण म्हणजे सिस्टिममध्ये पडलेले जुने दर. याबद्दल केंद्र सरकारच्या कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्लॉईज अँड वर्कर्स (Confederation of Central Government Employees and Workers) चे सरचिटणीस आर. एन. पराशर यांनी अतिरिक्त लेखा नियंत्रक धरित्री पांडा (Additional Controller General of Accounts Dharitri Panda)) यांना एक पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, एचआरए वाढवल्यानंतरही संगणक प्रणालीमध्ये एचआरएचे नवीन दर अनेक विभागांमध्ये आजपर्यंत अपडेट केले गेले नाहीत. यावर त्वरित कारवाई न केल्यास कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल. 1 जुलै 2021 पासून त्यांना हा लाभ मिळू शकणार नाही. कॉन्फेडरेशन तुम्हाला त्वरित कारवाई करण्याची विनंती करते.
एचआरए किती वाढवले?
मंत्रालयाने घरभाडे भत्ता शहराच्या आधारे 27 टक्के, 18 टक्के व 9 टक्के केला आहे. हे वर्गीकरण X, Y आणि Z वर्गाच्या शहरांनुसार आहे. म्हणजेच, जो X वर्गातील शहरात राहतो, त्याला आता अधिक एचआरए मिळेल. यानंतर Y वर्ग आणि नंतर Z वर्ग या शहरांना मिळेल.
एचआरए पूर्वी किती होता?
सातव्या वेतन आयोगात एचआरएची पद्धत बदलली असल्याचे अखिल भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा संघटनेचे सहाय्यक महासचिव एच. एस. तिवारी यांनी सांगितले. यामध्ये X, Y आणि Z या शहरांच्या तीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. यासह एचआरएचा दर पूर्वी 24 टक्के, 18 टक्के आणि 9 टक्के निश्चित करण्यात आला होता. सातव्या वेतन आयोगाने देखील शिफारस केली होती, की जेव्हा डीए 25 टक्के अंक ओलांडेल तेव्हा त्यात सुधारणा केली जाईल. आता कर्मचाऱ्यांचा डीए वाढून 28 टक्के झाला आहे.
X, Y आणि Z श्रेणीचा अर्थ
50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे X वर्गात येतात. येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता 27 टक्के एचआरए मिळेल. त्याचबरोबर Y श्रेणी शहरांमध्ये एचआरए 18 टक्के असेल. Z श्रेणीमध्ये एचआरए 9 टक्के असेल.
एचआरएचं कॅल्क्युलेशन कसं करणार?
50 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी कमीतकमी 5400 रुपये एचआरए निश्चित केले आहेत. तर दुसऱ्या प्रकारात हे दरमहा 3600 रुपये आणि 1800 रुपये आहेत. आता एचआरएची गणना नवीन दरावर आधारित असेल. ऑगस्टमध्ये पगारामध्ये एचआरए वाढ होईल, परंतु त्यापूर्वी सरकारला त्याची यंत्रणा अद्ययावत करावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.