chartered accountant sakal
एज्युकेशन जॉब्स

CA Exam : सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल जाहीर

जुन्या व नवीन पद्धतीने ही परीक्षा पार पडली आहे. या दोन्ही पद्धतीतून एकूण १४ हजार ४६ परीक्षार्थी सीए म्हणून पात्र ठरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

जुन्या व नवीन पद्धतीने ही परीक्षा पार पडली आहे. या दोन्ही पद्धतीतून एकूण १४ हजार ४६ परीक्षार्थी सीए म्हणून पात्र ठरले आहे.

पुणे - सनदी लेखापाल (सीए) (Chartered Accountant) अंतिम परीक्षेचा निकाल (Exam Result) जाहीर (Declare) झाला आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘सीए फायनल’ (नवीन पद्धत) परीक्षेत ८०० पैकी ६४० गुण मिळवत सुरतच्या राधिका बेरीवालने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, दुसरा क्रमांक नितीन जैनने (६३२ गुण) आणि चेन्नईच्या निवेदिता एन (६२४ गुण) हिने तिसरा क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस ऑफ इंडियाकडून (आयसीएआय) देण्यात आली आहे.

जुन्या व नवीन पद्धतीने ही परीक्षा पार पडली आहे. या दोन्ही पद्धतीतून एकूण १४ हजार ४६ परीक्षार्थी सीए म्हणून पात्र ठरले आहे. फाउंडेशन परीक्षा डिसेंबर महिन्यात ८६२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेत एकूण एक लाख १० हजार ६६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३३ हजार ५१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३०.२८ टक्के आहे, असे आयसीएआयकडून सांगण्यात आले.

परीक्षेचा निकाल -

१) नवीन पद्धत -

तपशील - ग्रुप एक - ग्रुप दोन - अंतिम परीक्षेसाठी

प्रविष्ट झालेले - ५७,२५४ - ५४,१४४ - २८,९८८

उत्तीर्ण - १२,७६७ - १६,५२५ - ४,४३६

टक्के - २२.३ः ३०.५२ - १५.३१

सीए म्हणून पात्र ठरलेले - ११,८६८

२) जुनी पद्धत -

तपशील - ग्रुप एक - ग्रुप दोन - अंतिम परीक्षेसाठी

प्रविष्ट झालेले - ११,३६४ - १४,१०६ - ३,१०९

उत्तीर्ण - १,२८४ - १,९०९ - ४४

टक्के - ११.३ - १३.५३ - --

सीए म्हणून पात्र ठरलेले - २,१७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT