CLAT 2021 : सीएलएटी परीक्षेची अंतिम Answer-key आज जाहीर करण्यात येणार असून नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (Consortium of National Law Universities, CNLU) आज 27 रोजी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्टसाठी (CLAT 2021 ) Answer-key जाहीर करेल. दरम्यान, जे विद्यार्थी CLAT 2021 परीक्षेस बसले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक consortiumofnlus.ac.in या वेबसाइटवरती ऑनलाइन तपासू शकतात. परीक्षेची Answer-key यापूर्वीच जाहीर करण्यात आली होती. तसेच उमेदवारांना 24 जुलैपर्यंत हरकती घेण्याचीही संधी देण्यात आली होती. मात्र, आता अंतिम Answer-key जाहीर होण्याची शक्यता आहे. (clat-2021-final-answer-key-will-be-releasing-today-on-july-27)
CLAT 2021 Results : सीएलएटी Answer-key कशी तपासायची?
कॉमन लॉ अॅडमिशन टेस्टची अंतिम Answer-key डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळला consortiumofnlus.ac.in भेट द्यावी. त्यानंतर सीएलएटी 2021 चा निकाल पाहण्यासाठी दुव्यावर (CLAT 2021) क्लिक करावे व येथे आवश्यक तपशील भरावा आणि लॉगिन करावे. आता सीएलएटी 2021 चा निकाल स्क्रीनवर दिसून येईल. तो डाउनलोड करा.
या तारखा लक्षात ठेवा
CLAT परीक्षेचा निकाल 28 जुलै 2021
CLAT 2021 अंतिम Answer-key 27 जुलै 2021
29 जुलै 2021 रोजी कौन्सलिंग सूची जाहीर होणार
CNLU ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, एकत्रित गुणवत्ता यादी 28 जुलै रोजी जाहीर केली जाईल. 29 जुलै रोजी कौन्सलिंग सूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर पहिली गुणवत्ता यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर होईल. CNLU ने या संदर्भात सीएलएटीचे वार्षिक कॅलेंडर अधिकृत वेबसाइटवर जारी केले असून कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (सीएलएटी) परीक्षा 23 जुलै रोजी घेण्यात आलीय. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळला consortiumofnlus.ac.in भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
clat-2021-final-answer-key-will-be-releasing-today-on-july-27
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.