CNC Easy job option  sakal
एज्युकेशन जॉब्स

सी.एन.सी. नोकरीचा सहज पर्याय

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाटचालीमध्ये केवळ सॉफ्टवेअरमध्ये कौशल्ये प्राप्त करून भागणार नाही, तर उत्पादन क्षेत्रात म्हणजेच हार्डवेअर बनवण्यातही कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

दखल

निशिकांत चक्रदेव

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाटचालीमध्ये केवळ सॉफ्टवेअरमध्ये कौशल्ये प्राप्त करून भागणार नाही, तर उत्पादन क्षेत्रात म्हणजेच हार्डवेअर बनवण्यातही कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. सीएनसी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उत्पादन क्षेत्रातही आपला ठसा उमटवू शकतो. एन. सी. म्हणजे न्यूमरिकल कंट्रोल. सीएनसी म्हणजे कॉम्प्युटराइज्ड न्यूमरिकल कंट्रोल.

औद्योगिकरणाच्या सुरुवातीच्या काळात अभियांत्रिकी कार्यशाळेत वापरली जाणारी सर्व यंत्रे मानवचलित होती. एखादा जॉब बनवण्यासाठी यंत्राच्या स्लाइडची विशेष हालचाल होणे आवश्यक असते. मानवचलित यंत्रावर कॉम्पोनन्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या स्लाइडच्या हालचालींचे नियंत्रण त्या यंत्राचा ऑपरेटर करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या यंत्रावर बनणाऱ्या कॉम्पोनन्टची गुणवत्ता ऑपरेटरच्या कौशल्यावर अवलंबून असते. कॉम्पोनन्ट बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मशीनच्या स्लाइडच्या हालचालींचे नियंत्रण, तसेच काही इतर कामे, जसे मशीन स्पिंडलला चालू-बंद करणे किंवा कुलंट मोटरला चालू-बंद करणे या सर्व गोष्टींचे नियंत्रण एका सांकेतिक माहितीद्वारे केली जाते. अशा सांकेतिक माहितीला ‘पार्ट प्रोग्राम’ असं म्हणतात. थोडक्यात, ‘सीएनसी’ म्हणजे अशी पद्धती जिच्यामध्ये कॉम्पोनन्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या मशीनच्या स्लाइडच्या हालचालीचे नियंत्रण सांकेतिक माहितीद्वारे केले जाते.

सीएनसीमधील रोजगाराच्या संधी

१) सीएनसी मशीन ऑपरेटर

यामध्ये प्रामुख्याने सीएनसी लेथ ऑपरेटर आणि सीएनसी मिलिंग मशीन ऑपरेटर या पदासाठी रोजगाराची संधी उपलब्ध आहे. बऱ्याच वेळेला सीएनसी मशीन ऐवजी व्ही.एम.सी. असा उल्लेख केला जातो. यामध्ये फारसा फरक नाही. व्ही.एम.सी.मध्ये म्हणजेच व्हर्टिकल मशिनिंग सेंटरमध्ये स्वयंचलित टूल चेंजर असतो. याखेरीज सीएनसी वायरकट ई.डी.एम. मशीन, सीएनसी ग्राइंडिंग, सीएनसी लेजर कटिंग, सीएनसी प्लाज्मा कटिंग. सीएनसी वॉटर जेट मशीन यांसारख्या सीएनसी तंत्रज्ञानावर चालणाऱ्या अनेक मशीनच्या ऑपरेटर या पदासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही आयटीआयमध्ये टर्नर, मिलर, मशीनिस्ट या ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आवश्यक अनुभव असल्यास फिटर हा ट्रेड असलेला उमेदवारसुद्धा चालू शकतो.

२) सीएनसी प्रोग्रामर

या पदासाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा किंवा डिग्री इन मेकॅनिकल/प्रॉडक्शन इंजिनीरिंग अशी आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्रमाणपत्र असलेला अनुभवी उमेदवार सीएनसी प्रोग्रामरचे काम करू शकतो. सीएनसी प्रोग्रामिंग आणि माहिती तंत्रज्ञानातील इतर सॉफ्टवेअरचे प्रोग्रामिंग यामध्ये बराच फरक आहे. सीएनसी प्रोग्रामरला वर्कपीस ड्रॉइंग, मशीन ऑपरेशन, कटिंग टूलची निवड, तसेच कॉम्पोनन्ट व टूल सेटिंग याची माहिती असणे आवश्यक आहे. सीएनसी मशीन वेगवेगळ्या कंट्रोल सीस्टमद्वारे कार्यान्वित केले जाते. सध्या बाजारात फानूक, सीमेन्स, फिडिया यांसारख्या अनेक कंट्रोल सीस्टिम उपलब्ध आहेत. या प्रत्येक कंट्रोल सीस्टिमची अनेक व्हर्जन्स बाजारात उपलब्ध आहेत. सीएनसी प्रोग्रामिंग ही रिमोट ॲक्टिव्हिटी नाही. मशीनवर जॉब लोड केल्यापासून पहिल्या काही कॉम्पोनन्टचे उत्पादन सुरू होईपर्यंत सीएमसी प्रोग्रामरचा सहभाग आवश्यक आहे. सीएनसी प्रोग्रामिंगच्या मॅन्युअल पार्ट प्रोग्रामिंग आणि संगणकाच्या मदतीने केलेले पार्ट प्रोग्रामिंग.

मॅन्युअल पार्ट प्रोग्रामिंगची कामे

कॉम्पोनन्ट ड्रॉइंगचा काळजीपूर्वक अभ्यास करणे. यामध्ये मटेरियल, टॉलरन्सेस आणि सरफेस फिनिश यावर लक्ष देणे आवश्यक आहे. वर्कपीस किती सेटअपमध्ये बनवायचा आहे, हे ठरवणे. त्याचप्रमाणे वर्क पीस कोणत्या मशीनवर बनवायचा आहे? हे ठरवणे. प्रत्येक सेटअपसाठी डाटम ठरवणे,

वर्कपीस पकडण्यासाठी डिझाइन करणे, वर्कपीस बनवण्यासाठी लागणारा प्रोसेस आणि त्याचा क्रम ठरवणे, कोणते कटिंग टूल लागणार आहे हे ठरवणे आणि त्याचा कटिंग डेटा ठरवणे, पार्ट प्रोग्राम लिहिणे व पार्ट प्रोग्राम मशीनमध्ये फीड करणे अशी विविध कामे करावी लागतात.

संगणकाद्वारे पार्ट प्रोग्राम

आज बाजारामध्ये सीमेन्स युनिग्रफिक्स, प्रो इंजिनीअर, डेलकॅम, सीमेट्रोन, मास्टर कॅम, सर्फकॅम असे वेगवेगळे कॅड/कॅम सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. आजच्या घडीला कॅड (कॉम्प्युटर एडेड डिझाइन) या क्षेत्रात कुशल आणि अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध असले तरी, कॅम या क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. या पदासाठीसुद्धा शैक्षणिक पात्रता डिप्लोमा किंवा डिग्री इन मेकॅनिकल/प्रॉडक्शन इंजिनिरिंग अशी आहे. संगणकाच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या प्रोग्रामिंगमध्ये डिझाइन मॉडेल आणि वर्कपीस यावरून उत्पादन मॉडेल बनवणे, टूलचा डेटा बेस बनवणे, कटिंग टूल, मशीन टूल आणि लागणारे फिक्सर यावरून उत्पादन डेटा बेस बनविणे. कॉम्पोनन्ट किती सेटअपमध्ये बनवायचा आहे, हे ठरवणे. तसेच, या सर्व गोष्टी काळजीपूर्वक फीड केल्यानंतर कॅम सॉफ्टवेअर कटर लोकेशन डेटा फाइल (सीएलएफ) बनवते. या फाइलमध्ये कटर वर्कपीस ज्या बिंदूंवरून जाणार आहे त्याची फक्त यादी असते. या कटर लोकेशन डेटा फाइवरून कंट्रोल सिस्टम आणि मशीन टूल यांना चालू शकणारा सीएनसी प्रोग्राम बनविला जातो. कटर लोकेशन डेटा फाइलचे पोस्ट प्रोसेसिंग केल्यानंतर सीएनसी मशीनला आवश्यक असणारा प्रोग्राम आपल्याला मिळतो. अशी अनेक कामे करावी लागतात.

(लेखक डी.आर.डी.ओ.चे सेवानिवृत्त तांत्रिक आधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT