महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने नुकतेच अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्राच्या पदविका अभ्यासक्रमांचे निकाल घोषित केले.
पुणे - कोरोनामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या शिकविण्या ऑनलाइन झाल्या. मात्र परीक्षा घेताना काहींना कम्बाईन पासिंग आणि ऑनलाइन परीक्षेची सुविधा मिळाली, तर काहींना नेहमीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा द्यावी लागली. पर्यायाने सवलतीवाल्यांच्या निकालाची टक्केवारी वाढली तर ऑफलाईन परीक्षावाल्यांचा निकाल अभूतपूर्व घसरला. त्यामुळे सवलतीवाले सुपात, तर ऑफलाईनवाले जात्यात अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने नुकतेच अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्राच्या पदविका अभ्यासक्रमांचे निकाल घोषित केले. नेहमीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने झालेल्या या परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण ४० टक्क्यांनी घसरले असून, अनेक महाविद्यालयांच्या इतिहासात प्रथमच एवढे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहे. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कम्बाईन पासिंगची सुविधा दिल्यामुळे अभियांत्रिकी आणि आर्कीटेक्टच्या पदवी अभ्यासक्रमाचा निकाल यंदा २० टक्क्यांनी वाढला आहे. पदविका अभ्यासक्रमांच्या घसरलेल्या टक्केवारीबद्दल काही प्राचार्य सांगतात, ‘‘प्रथमच पदविका अभ्यासक्रमांतील उत्तीर्णांचे प्रमाण एवढे घसरले आहे. केवळ आमच्याच नाही तर ओळखीतील सर्वच महाविद्यालयांतील पदविकांचा निकाल ३० ते ४० टक्क्यांनी घसरला आहे. यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून, आम्ही सर्व संभ्रमात आहोत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमतेची भावना निर्माण होऊ शकते. शासनाने तातडीने याची दखल घ्यावी.’’
राज्यातील व्यावसायिक शिक्षणातील विद्यार्थी -
१) सर्व पदविका (डिप्लोमा) (ऑफलाईन परीक्षा) -
शैक्षणिक वर्ष - संस्था - प्रवेश क्षमता - प्रत्यक्ष प्रवेश
२०१९-२० - ७९६ - १,४२,५४७- ७५,२४०
२०२०-२१ - ५९८ - १,२४,८०५ - ६७,३४७
२०२१-२२ - ४९५ - १,१५,६८८ - उपलब्ध नाही
२) अभियांत्रिकीचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम -
शैक्षणिक वर्ष - संस्था - प्रवेश क्षमता - प्रत्यक्ष प्रवेश
२०१९-२० - ३७० - १,५२,६७५ - ८१,४४७
२०२०-२१ - ३६४ - १,५०,८५२ - ८६७७७
२०२१-२२ - ३५८ - १,५१,८२७ - उपलब्ध नाही
(स्रोत - एआयसीटीई)
महत्त्वाचे मुद्दे...
- काहींना सवलत तर काहींना नाही, त्यामुळे शैक्षणिक असमानतेची भावना
- दोन्ही परीक्षा पद्धतीत उत्तीर्णांच्या संख्येत मोठी तफावत
- ऑफलाईन परीक्षेतील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची चिंता, निकाल घसरल्यामुळे नकारत्मकता वाढली
- निकाल घसरल्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक चिंतेत
कम्बाईन पासिंगमुळे निश्चितच पदवीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्णांचे प्रमाण वाढले आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी ही सर्वस्वी त्यांच्या परिश्रमाच्या आधारे आहे. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णांच्या घसरलेल्या टक्केवारीबद्दल सविस्तर माहिती घ्यावी लागेल.
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
कोरोनामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रच अभूतपूर्व अडचणींचा सामना करत आहे. ऑनलाइन शिकवणी आणि ऑफलाईन परीक्षेमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का घसरेल म्हणून पुणे विद्यापीठाने कम्बाईन पासिंगचा निर्णय घेतला. तसाच निर्णय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने घेतला. तर पदविकेच्या विद्यार्थ्यांवरील अन्याय काहीसा दूर होईल.
- संस्थाचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.