सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
CRPF Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) विविध पदांच्या भरतीसाठी नुकतेच नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेय. या भरतीतून स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर आणि जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसरची (GDMO) पदे भरली जाणार आहेत.
दरम्यान, या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीतून होणार आहे. तसेच उमेदवारांना सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाइटवर crpf.gov.in नोटिफिकेशनही पाहता येणार आहे. उमेदवारांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जाणार आहे.
रिक्त जागा : या प्रक्रियेद्वारे एकूण 60 रिक्त पदांवर भरती केली जाणार असून त्यामध्ये स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसरच्या 29 आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरच्या 31 जागा भरल्या जातील.
पगार : स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति महिना 85 हजार रुपयांपर्यंत, तर जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार रुपये पगार मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता : स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पदवी/डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभवही आवश्यक आहे. तसेच जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदाच्या भरतीसाठी उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी आणि इंटर्नशिप पूर्ण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
मुलाखतीचा तपशील : उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ही मुलाखत २२ नोव्हेंबर आणि २९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. मुलाखतीनंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही केली जाईल. अधिकृत वेबसाइटवर http://www.crpf.gov.in यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.