सोलापूर : सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (Central Reserve Police Force, CRPF) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. सीआरपीएफने वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर) (Medical Officer) पदे भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सीआरपीएफच्या विविध युनिटमध्ये एकूण 16 पदे नियुक्त केली जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर अधिसूचना वाचू शकतात, त्यानंतर उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. (CRPF recruitment for the post of Medical Officer will be interviewed)
केंद्रीय राखीव पोलिस दलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. ही मुलाखत सोमवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता घेतली जाईल. मुलाखतीच्या फेरीसाठी उमेदवारांना जीसी, सीआरपीएफ, श्रीनगर (जम्मू व काश्मीर) येथे पोचावे लागेल. यासह उमेदवारांनी ठरलेल्या वेळेत पोचण्याची विशेष काळजी घ्यावी. वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित असताना उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांची मूळ आणि फोटोकॉपी (डिग्री सर्टिफिकेट, वयाचा पुरावा आणि अनुभव प्रमाणपत्रे आदी) आणली पाहिजे. यासह साध्या कागदावर अर्ज करताना त्यात अर्ज करणाऱ्या पदाचे नाव आणि पाच पासपोर्ट आकाराचे फोटो देखील लावावे. या व्यतिरिक्त अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार सीआरपीएफची अधिकृत साइट तपासू शकतात.
शैक्षणिक पात्रता
मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे; तसेच त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. त्याचबरोबर या पदावरील उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयात सूट देण्यात येणार आहे.
असे असेल वेतन
वैद्यकीय अधिकारी पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 75,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.