studying abroad esakal
एज्युकेशन जॉब्स

परदेश शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

अरूण मलाणी


नाशिक :
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविले आहेत. २०२१-२२ या वर्षासाठी विद्यार्थ्यांना १८ ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. सहसंचालक कार्यालयास अर्जाच्‍या प्रतीसह आवश्‍यक कागदपत्रांच्‍या पूर्ततेसाठी २० ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल.

पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी, टाइम्‍स हायर एज्‍युकेशन (THE) किंवा क्‍यूएस (QS) क्रमवारीत दोनशेच्‍या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते. ही योजना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीच्‍या पार्श्वभूमीवर वित्तीय तुटवड्यामुळे राबविली नव्हती. काही सुधारणांसह शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्याची संधी असेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांपैकी ज्यांची निवड होईल, त्यांना प्रथम वर्ष वगळता पुढील अभ्यासक्रमाच्या मान्य कालावधीसाठी शिष्यवृत्ती देय राहील, असे स्‍पष्ट केले आहे.
योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, मिळणारे लाभ, शिष्यवृत्तीच्या लाभासाठी निवड कार्यपद्धती आदी माहिती www.foreignscholarship2021.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेचा जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.

विभागातील विद्यार्थ्यांना अडचणींसाठी सहाय्यता

नाशिक विभागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही अडचणी असल्यास त्यांना मदत उपलब्‍ध होणार आहे. तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक येथील समन्वयक जयंत गजानन जोशी यांना ७८७५२७६१३६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

या शिक्षणक्रमांसाठी मिळेल शिष्यवृत्ती

विविध सहा शाखांत पदव्‍युत्तर पदविका/ पदव्‍युत्तर पदवी आणि डॉक्‍टरेट शिक्षणक्रमासाठी प्रत्‍येकी एक, अशा एकूण दोन जागा उपलब्‍ध असतील. कला, वाणिज्‍य, विज्ञान, व्‍यवस्‍थापन, विधी आणि औषध निर्माणशास्‍त्र अशा या सहा शाखा आहेत, तर अभियांत्रिकी/वस्‍तुकला शास्‍त्र या शाखेसाठी प्रत्‍येकी चार याप्रमाणे आठ जागांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

SCROLL FOR NEXT