scholarship exam esakal
एज्युकेशन जॉब्स

Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत्या २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली होती. परंतु अद्याप शाळांनी ऑनलाइन माहिती आणि आवेदनपत्र भरलेले नाहीत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळा माहिती प्रपत्र, ऑनलाइन आवेदनपत्र आणि नियमित शुल्क ऑनलाइन भरण्याची मुदत २० डिसेंबर आहे. तसेच, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी २१ ते २५ डिसेंबरपर्यंत, तर अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २६ ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. शाळांनी आपली माहिती आणि आवेदनपत्र मुदतीत भरावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे.

आतापर्यंत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या -

शिष्यवृत्ती : अर्ज भरण्याची प्रक्रिया झालेले : अर्ज प्रलंबित झालेले : अर्जांची एकूण संख्या

इयत्ता पाचवी : ३,६५,१२१ : ९५,६८८ : ४,६०,८०९

इयत्ता आठवी : २,३०,२४६ : ८१,५१७ : ३,११,७६३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT