Do not aim for degree job Sanjiv bajaj to Students Inauguration of buildings of COEP education pune sakal
एज्युकेशन जॉब्स

Sanjiv Bajaj : पदवी, नोकरीपुरते ध्येय नको; संजीव बजाज यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

‘सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठा’त (सीओईपी टेक) बुधवारी विविध संस्थांच्या इमारतींचे उद्गाटन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवून नोकरी करणे हेच ध्येय न ठेवता त्यापलीकडील विचार करावा, असा कानमंत्र देताना ‘बजाज फिनसर्व्ह’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी विद्यापीठांनाही सल्ला दिला.

‘सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठा’त (सीओईपी टेक) बुधवारी विविध संस्थांच्या इमारतींचे उद्गाटन करण्यात आले. सीओईपी टेकचे नियामक मंडळ तसेच ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. आगाशे याप्रसंगी उपस्थित होते.

विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रमांची निर्मिती करून ते सातत्याने अद्ययावत करणे महत्त्वाचे असल्याचे बजाज यांनी आवर्जून नमूद केले. बजाज समूहातील विविध कंपन्यांमध्ये ‘सीओईपी’तील अधिकाधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

सीओईपी विद्यापीठाने माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून सल्लागार मंडळ तयार करावे. या मंडळाच्या माध्यमातून विद्यापीठाचा जागतिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा बजाज यांनी व्यक्त केली. त्यास सहमती दर्शवीत प्रतापराव पवार यांनी असे मंडळ स्थापन करण्याची ग्वाही दिली.

प्रतापराव पवार म्हणाले की, ‘‘नोकरी करणारे विद्यार्थी तयार होण्यापेक्षा नोकरी देणारे अधिकाधिक विद्यार्थी तयार व्हावेत, असे विद्यापीठाचे ध्येय आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल होत आहे.

प्रत्यक्ष व्यावसायिक, तज्ज्ञ यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’वर भर दिला जात आहे.’’ सीओईपीचा चिखली येथेही कॅम्पसचा विस्तार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बजाज स्कूल ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मॅकडर्मिड अल्फा सेंटर ऑफ एक्सलन्स इन ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड स्किल डेव्हलपमेंट आणि विप्रो-पारी सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड महेश काळे रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन लॅबोरेटरी या इमारतींचे उद्‌घाटन झाले.

‘बजाज फिनसर्व्ह एससी-सीएसआर’च्या अध्यक्षा शेफाली बजाज, ‘मॅकडर्मिड अल्फा इलेक्ट्रॉनिक्स सोल्युशन्स’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवी भटकळ, ‘विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रणजित दाते, ‘सीओईपी’चे माजी संचालक डॉ. बी. बी. अहुजा आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. आगाशे यांनी प्रास्ताविक केले.

देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादन क्षेत्राचा वाटा मोठा आहे. त्याशिवाय संपूर्ण जग भारताकडे उत्पादन क्षेत्रातील मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहे. त्यामुळे अभ्यासक्रमातही उत्पादन क्षेत्रातील नव्या बदलांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमातील सिद्धांत हे प्रत्यक्षात कसे उपयुक्त ठरतात, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावे.

- डॉ. रणजित दाते, व्यवस्थापकीय संचालक, विप्रो पारी प्रायव्हेट लिमिटेड

औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ते विकसित करण्यासाठी विद्यापीठांतून प्रयत्न व्हावेत. विद्यापीठातील विभागांमार्फत विद्यार्थ्यांना त्या-त्या क्षेत्रात काय बदल होत आहेत, हे शिकविण्यात यावे. त्याशिवाय विद्यापीठात संबंधित विभागातील आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविण्यात यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान संपादन करता येईल.

- डॉ. रवी भटकळ, व्यवस्थापकीय संचालक, मॅकडर्मिड अल्फा इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतसाठी खजिना उघडणारा लखनऊ सुपर जायंटचा मालक कोण? किती आहे संपत्ती?

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सिंबा देतोय कॅन्सरशी झुंज ; मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्याही डोळ्यात आलं पाणी

Kolhapur: पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT