Medical Career Sakal
एज्युकेशन जॉब्स

हेल्थ केअर : संख्याशास्त्र आणि मेडिकल करिअर

इंग्लंडमध्ये असे म्हटले जाते की या देशाच्या पंतप्रधानाएवढा पगार पाहिजे असेल तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलही नको तुम्ही संख्याशास्त्र (स्टॅटेस्टिक्स) मध्ये पदवी घ्या आणि स्पेशलायझेशन बायोस्टॅटिस्टिक्समध्ये करा.

डॉ. नानासाहेब थोरात

इंग्लंडमध्ये असे म्हटले जाते की या देशाच्या पंतप्रधानाएवढा पगार पाहिजे असेल तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलही नको तुम्ही संख्याशास्त्र (स्टॅटेस्टिक्स) मध्ये पदवी घ्या आणि स्पेशलायझेशन बायोस्टॅटिस्टिक्समध्ये करा.

इंग्लंडमध्ये असे म्हटले जाते की या देशाच्या पंतप्रधानाएवढा पगार पाहिजे असेल तर इंजिनिअरिंग आणि मेडिकलही नको तुम्ही संख्याशास्त्र (स्टॅटेस्टिक्स) मध्ये पदवी घ्या आणि स्पेशलायझेशन बायोस्टॅटिस्टिक्समध्ये करा. परिस्थितीमुळे किंवा मार्कांमुळे ज्यांना इंजिनिअर किंवा डॉक्टर होता येत नाही त्यांच्यासाठी संख्याशास्त्र विषयात पदवी तसेच पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) घेऊन मेडिकल किंवा औषधनिर्माण क्षेत्रातील कामाचा अनुभव घेतल्यास आयटी इंजिनिअरपेक्षा मोठे पॅकेज मिळू शकते.

बायोस्टॅटिस्टिक्स हे असे शास्त्र आहे जे औषध, जीवशास्त्र, पर्यावरण विज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित क्षेत्रातील संशोधनासाठी सांख्यिकीय सिद्धांत आणि गणितीय नियमांचा उपयोग करते. कोरोनाचा दररोजचा कल अभ्यासण्यासाठी याच शास्त्राची मदत घेतली जाते. लोकांचे सार्वजनिक आरोग्य आणि रोग तसेच विविध समुदायांमधील आरोग्य ट्रेंड ओळखण्यासाठी त्यांचे कारण निश्चित करण्यासाठी, आणि कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी सांख्यिकीय वैज्ञानिक पद्धती वापरतात. गेल्या दहा वर्षात या शाखेने करिअरच्या संधी निर्माण केल्या आहेत. भविष्यातही संधी निर्माण होत आहेत. आरोग्य क्षेत्रात सांख्यिकीय पद्धती वापरून पुढील नवीन करिअरच्या संधी निर्माण करू शकतो.

1) सध्याच्या उपचारांच्या तुलनेत नवीन औषधांच्या परिणामकारकतेचे विश्लेषण बिनचूक करू शकतो.

2) शारीरिक किंवा नैसर्गिक जोखीम घटकांचा रोग किंवा इतर आरोग्य परिणामांशी संबंध निश्चित करता येतो आणि एखाद्या रोगाचे नेमके निदान करता येते.

3) जैविक घटना आणि आरोग्य परिणामांची संभाव्यता स्पष्ट करता येते.

4) प्रयोगशाळेत निर्माण केल्या जाणाऱ्या औषधांचे प्राण्यांवरील आणि मानवी चाचण्यांचे निष्कर्ष हे सांख्यिकीय पद्धती वापरूनच तयार केले जातात.

5) लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या वयोवृद्धाला अनेक रोगांवर तयार केलेली लस दिली जाते, त्या लशीच्या निर्मितीपासून, मानवी चाचण्या आणि शेवटी कोट्यवधी लोकांना त्याचे डोस देणे या सर्व प्रक्रियांमध्ये सांख्यिकीय पद्धतीच वापरल्या जातात.

6) टेलिमेडिसिन आणि डिजिटल मेडिसिनच्या क्षेत्रातही संख्याशास्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.

लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनिअर हीच करिअरची क्षेत्रे खुणावत असतात. पण याच क्षेत्रात यापेक्षा वेगळे काही करण्याची आवड असलेल्यांनी बायोस्टॅटिस्टिक्स या क्षेत्राचा नक्कीच विचार करावा. माहिती गोळा करणे आणि अभ्यास करणे, परिस्थितीचा अंदाज लावणे आणि निष्कर्ष काढणे आवडत असल्यास, हे तुमच्यासाठी योग्य आरोग्य करिअर असू शकते. कोरोनानंतरच्या जगात या करिअरला जास्त मागणी आहे आणि सार्वजनिक आरोग्याच्या अनेक पैलूंचा शोध घेण्यात स्वारस्य असल्यास तुम्ही शैक्षणिक किंवा क्लिनिकल क्षेत्रामध्ये किंवा या पदवीसह खासगी सल्लागार म्हणून पुढे जाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT