Plane Cargo Service Sakal
एज्युकेशन जॉब्स

न्यू नॉर्मल : कार्गोसेवेसाठी पायाभूत सुविधांची आव्हाने

‘जीएमआर’ हैदराबाद विमानतळाच्या एअर कार्गो विभागाने लस व औषधे यांची सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने हाताळण्याची आणि वाहतूक करण्याची जबाबदारी घेतली आहे.

डॉ. प्राची जावडेकर

‘जीएमआर’ हैदराबाद विमानतळाच्या एअर कार्गो विभागाने लस व औषधे यांची सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने हाताळण्याची आणि वाहतूक करण्याची जबाबदारी घेतली आहे.

जागतिक स्तरावर लसनिर्मिती क्षमतेचा हैदराबाद सर्वांत मोठा प्रदेश आहे. ‘जीएमआर’ हैदराबाद विमानतळाच्या एअर कार्गो विभागाने लस व औषधे यांची सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने हाताळण्याची आणि वाहतूक करण्याची जबाबदारी घेतली आहे. येथे ‘तापमान-संवेदनशील’ औषधे हाताळण्यासाठी विशेष टर्मिनल आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी आणि जागतिक आरोग्य संघटनेद्वारा प्रमाणित आहे. संपूर्ण मालाची वाहतूक नियंत्रित तापमानात करू शकणारे अद्ययावत ‘कूल-चेन सोल्युशन’ आणि वातानुकूलित कंटेनरचे सर्वांत मोठे केंद्र आहे.

या टर्मिनलची १७० तासांपर्यंत शिपमेंटचे तापमान राखण्याची क्षमता जगातील सर्वोच्च आहे. विशेषतः वैद्यकीय मालवाहतुकीसाठी पायाभूत सुविधा देणारे हे कार्गो टर्मिनल त्याच्या व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी देशातील सर्वाधिक पुरस्कृत कार्गो टर्मिनल्सपैकी एक आहे. या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी चर्चा, त्यांच्या मुलाखती व त्या व्यवसायाचा अभ्यास यातूनच पुढे केला गेला. पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी व त्यासाठी नियमात केलेले बदल व रोजचे वाढलेले उद्दिष्ट अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी २०१९पासून १०० कोटींची गुंतवणूक २०० प्रकारचे डेटाबेस, १६ मंत्रालयांची मोट यामुळेच या गतीशक्तीची सारे अश्व जोडले. अशक्य वाटले होते ते आता घडून येताना दिसत आहे. ‘सबका साथ, सबका प्रयास’ हे सूत्र ‘कार्गो’ ने उचलून धरले आहे.

दक्षिण आशियातील सर्वात मोठे कार्गो गेटवे म्हणजे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे (DIAL) कार्गो हब दरवर्षी दहा लाख टन कार्गो हाताळते. दीड लाख मेट्रिक टन तापमान संवेदनशील कार्गो हाताळण्याची क्षमता, ३० हजार चौरस मीटर विमानतळावरील वेअरहाउसिंग सुविधा, ट्रान्सशिपमेंट एक्सलन्स सेंटर असणारे हे भारतातील पहिले विमानतळ आहे.

देशाच्या राजधानीत स्थित धोरणात्मक स्थान, विस्तृत पायाभूत सुविधा आणि कार्यक्षम एअर कार्गो हाताळणी सेवा यामुळे हे भारताचे पसंतीचे एअर कार्गो हब आहे. दिल्ली-कार्गो हब १५० एकर क्षेत्रात पसरलेले आहे. त्यामध्ये २ कार्गो टर्मिनल्स, ऑन-एअरपोर्ट लॉजिस्टिक सेंटर, ७५ आंतरराष्ट्रीय, ६९ देशांतर्गत गंतव्यस्थानांना जोडणाऱ्या विमान सेवा, आणि १७ मालवाहू विमान कंपन्या समाविष्ट आहेत.

दिल्ली विमानतळाने जीवोदय गोदाम नावाची सुविधा ३,५०० चौरस मीटरवर उभारली आहे. कोरोना संबंधित बचाव कार्यासाठी लागणाऱ्या, औषध व इतर सामग्रीची साठवण आणि वितरणासाठी ही महत्त्वपूर्ण सुविधा आहे.

दिल्ली एअर कार्गो टर्मिनल हे पहिले १०० टक्के ई-मालवाहतूक प्रक्रिया साध्य करण्यासाठी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून ‘E-AWB 360 प्रमाणपत्र प्राप्त केलेले पहिले विमानतळ आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत असलेले, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे मुंबई एअर कार्गो टर्मिनल दरवर्षी नऊ लाख साठ हजार मेट्रिक टनांहून अधिक एअर कार्गो हाताळते.

सन २०१३ मध्ये मुंबई कार्गो टर्मिनलने, माक्स, ‘एअर कार्गो कम्युनिटी प्लॅटफॉर्म’ सादर केला. अशा स्वरूपाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म करणारे हे भारतातील पहिले विमानतळ आहे. AMAX एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म असून तो कार्गो टर्मिनल ऑपरेटरला सर्व एअर कार्गो भागधारकांशी जोडतो. एअर कार्गो वाहतूक राष्ट्रांना सक्षम करते. त्यांच्या भौगोलिक स्थानाची पर्वा न करता कार्यक्षमतेने दूरच्या बाजारपेठांशी आणि जागतिक पुरवठा साखळीशी जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने जोडते. आणि या व्यवसाय साखळ्यांचे केंद्रस्थान आहे ‘विमानतळ आणि तेथील कार्गो सुविधा’, एअर कार्गो व्यवसाय अनेक बदलांमधून जात आहे. विशेषतः कोरोनानंतर त्याचे महत्त्व झपाट्याने वाढते आहे. भारतीय हवाई वाहतूक कंपन्या मालवाहू विमानांची संख्या वाढवत आहेत. ई-कॉमर्स आणि झपाट्याने बदलणारे बाजारातील मागणीचे स्वरूप यामुळे बदलणाऱ्या कार्गो व्यवसायापुढे पायाभूत सुविधांची गरज, किचकट प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ ही प्रमुख आव्हाने आहेत. केंद्र सरकारने या आव्हानांसाठी योग्य ती ध्येय-धोरणे व नीतीचा अवलंब करून प्रगतिपथ आखला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT