Telemedicine Sakal
एज्युकेशन जॉब्स

न्यू नॉर्मल : टेलिमेडिसीन...!

टेलीमेडिसीनद्वारा केली जाणारी चिकित्सा आता अनेक राज्यात कायमस्वरूपी झाली आहे. तंत्रज्ञान, विज्ञान वेगवेगळी उपकरणे यांची सांगड घालून नव्या आरोग्यसेवांचा परीघ विस्तारत आहे.

डॉ. प्राची जावडेकर

टेलीमेडिसीनद्वारा केली जाणारी चिकित्सा आता अनेक राज्यात कायमस्वरूपी झाली आहे. तंत्रज्ञान, विज्ञान वेगवेगळी उपकरणे यांची सांगड घालून नव्या आरोग्यसेवांचा परीघ विस्तारत आहे.

टेलीमेडिसीनद्वारा केली जाणारी चिकित्सा आता अनेक राज्यात कायमस्वरूपी झाली आहे. तंत्रज्ञान, विज्ञान वेगवेगळी उपकरणे यांची सांगड घालून नव्या आरोग्यसेवांचा परीघ विस्तारत आहे. भारत हे मेडिकल टुरिझम साठी विशेष पसंतीचे ठिकाण होत आहे. प्रगत राष्ट्रांतून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण व ज्या उपचारांसाठी येतात त्यांचे स्वरूप दोन्ही आपल्या उत्तम आरोग्य सुविधांची खात्री देतात. भारतात डेंटल, हार्ट, किडनी, डोळे इत्यादी शस्त्रक्रिया व प्रक्रिया सुलभ, स्वस्त व पूर्णपणे सुरक्षित अशा घडतात. भारतातील आयुर्वेदिक हॉस्पिटल्स, योगा केंद्र भारताच्या जुन्या पद्धतींचा अवलंब करून मन व शरीर यांची सांगड घालणारी जीवनपद्धती यांचाही प्रचार व प्रसार जगभर करत आहेत. भारतात आरोग्याची सुविधा तुलनेने स्वस्त व योग्य डॉक्टरांद्वारा मिळते. आपल्याला मिळणारी सेवा अतिशय तत्पर, त्वरित व ताकदीची आहे. भारतात याचा लाभ शेवटच्या तळागाळातल्या समाजासाठी व्हावा याची काळजी घेणाऱ्या अनेक सुविधा सरकारने निर्माण केल्या आहेत.

राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा

डायल १०८/१०२ रुग्णवाहिका सेवा अंतर्गत कार्यरत रुग्ण वाहतूक रुग्णवाहिका ही एनएचएमची एक उपलब्धी आहे. आता ३५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशी सुविधा आहे. डायल १०८ ही प्रामुख्याने आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आहे. ती प्रामुख्याने गंभीर किंवा आपत्कालीन उपचार, आघात आणि अपघातग्रस्त इत्यादी रुग्णांसाठी डिझाइन केलेली आहे. डायल १०२ सेवांमध्ये मूलत-: गर्भवती महिला आणि मुलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने मूलभूत रुग्ण वाहतूक केली जाते.

राष्ट्रीय मोबाईल मेडिकल युनिट्स

दुर्गम, सेवा आणि संपर्क नसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी मोबाईल मेडिकल युनिट्ससाठी केंद्राकडून साहाय्य देण्यात आले आहे. आरोग्यसेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हा या धोरणाचा उद्देश आहे.

बायोमेडिकल इक्विपमेंट मॅनेजमेंट अँड मेंटेनन्स

हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा उपक्रम आहे. याद्वारे राज्य सरकारांना सर्व सुविधांसाठी सर्वसमावेशकपणे वैद्यकीय उपकरणांची देखभाल, आउटसोर्स करण्यासाठी साहाय्य केले जाते. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये आरोग्य सेवा सुधारणे-उपचारांचा खर्च कमी करणे आणि सेवेची गुणवत्ता सुधारणे हा याचा हेतू आहे.

विनामूल्य निदान सेवा

  • आवश्यक पॅथॉलॉजी इनिशिएटिव्ह - अत्यावश्यक पॅथॉलॉजी इनिशिएटिव्हचे उद्दिष्ट प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवेच्या विविध स्तरांनुसार मोफत आवश्यक निदान पॅकेजेसची खात्री देणे हे आहे.

  • टेलिरेडिओलॉजी उपक्रम - याद्वारे गरीब आणि वंचित लोकांना व्यवहार्य आणि किफायतशीर रेडिओलॉजी सेवा दिली जाते.

  • सीटी स्कॅन सेवा आणि तंत्रज्ञान साहाय्य - सीटी स्कॅन ही महागडी चाचणी असल्याने आणि भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकही सीटी स्कॅन सुविधा नसल्यामुळे, हा उपक्रम मोलाचा आहे.

मेरा अस्पताल

हा भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचा उपक्रम आहे.

सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची ही केंद्रीय खरेदी एजन्सी आहे. पारदर्शक आणि किफायतशीर पद्धतीने आरोग्य क्षेत्रातील वस्तू खरेदी करण्यासाठी सोसायटी म्हणून नोंदणीकृत आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांना आरोग्य क्षेत्रातील वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

इतर एजन्सी

‘सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा बॅनर’खाली वैद्यकीय सेवेसाठी संरक्षण खात्याची स्वत-ची संस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT