Decisiveness sakal
एज्युकेशन जॉब्स

निर्णयक्षमता...

डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

आपल्या पाल्याने कोणती शाखा निवडावी? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा? पाल्याने भविष्यात काय म्हणून बनावे? पारंपरिक विद्या शाखा निवडाव्यात की काही डिप्लोमा, कोर्सेस घ्यावेत?

आपल्या पाल्याने कोणती शाखा निवडावी? कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा? पाल्याने भविष्यात काय म्हणून बनावे? पारंपरिक विद्या शाखा निवडाव्यात की काही डिप्लोमा, कोर्सेस घ्यावेत? आपलाच व्यवसाय पुढे न्यावा की काही वेगळे करावे? असे अनेक प्रश्न सध्या आपल्याला सतावत असतील. अशा वेळेस कोणताही निर्णय घेताना आपण काय आणि कसा विचार करतो ते आपल्यातील क्षमता दर्शविते. निर्णय घेण्याकरिता पालकांनी, मुलांनी वेळेवरच जागृत होऊन, त्या प्रक्रियेला पुरेसा वेळ द्यायला हवा. कोणताही निर्णय हा घाई गडबडीत घेतला तर फसतो. निर्णयक्षमता विकसित करणारे काही निकष आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

संवाद

बोललात तर आपल्याला मदत, मार्गदर्शन करायला लोक तयार होतील. बोला व्यक्त व्हा, आपले मित्र मंडळी काय म्हणत आहेत हे जरूर ऐकल पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ते अगदी ऐकलेच पाहिजे असे नाही. पण त्यांचे विचार आपला कल, विचारांची विविधता समजून घ्यायला आणि आवड नक्की करायला मदतच करतील. मुक्त चर्चा, गप्पा हा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवून देऊ शकतो.

चौफेर विचार

निर्णय घेण्यापूर्वी अनेक बाबींचा विचार करायला हवा. किती वर्ष शिकावे लागणार आहे? जवळ उपलब्धता आहे का? एकूण खर्च काय येणार आहे? अशा विविध मनातील विचारांना समाधानकारक उत्तरे मिळवा. विविध कोर्सेसशी तुलना करा, कोणता आणि का निवडायचा त्याचे उत्तर तयार करा. उद्दिष्ट ठरवा आणि कामाला लागा. निर्णय घ्या, प्रकरण लटकत ठेऊ नका, वेळ गेल्यावर विचार करत बसून काय उपयोग?

अभ्यास

निर्णय घेण्यापूर्वी विविध शाखा, कोर्सेस, करिअर यांच्याविषयी अभ्यास आवश्यक. अभ्यास कशाचा तर प्रत्येक शाखेमध्ये कोणते विषय असणार आहेत? ते आपल्या आवडीचे आणि पेलवणारे आहेत ना? त्या विषयातील साहित्य उपलब्ध आहे का? पुढे जाऊन त्या शिकण्यातून व्यवसाय संधी काय उपलब्ध होणार? असे अनेक विषय अभ्यासले जाऊ शकतात. कोणताही निर्णय अशा अभ्यासाशिवाय घेऊ नये.

भावनांचा परिणाम

अनेक निर्णय हे केवळ भावनांच्या आहारी जाऊन घेतले जातात आणि मग आयुष्यभर पस्तावण्याची वेळ येते. मी डॉक्टर आहे म्हणजे माझ्या मुलीनेही तोच व्यवसाय करायला हवा हीच ती भावनाधिनता. मी असा निर्णय घेतला तर आई-वडिलांना काय वाटेल. भावनेच्या आहारी जाणं. इतरांच्या विचारांवर अवलंबून राहून निर्णय घेणं हे धोकादायकच. ज्याच्या विषयी निर्णय घ्यायचाय त्याला लक्षात घेणं, विचारात घेणं गरजेचं. विचार लादणंही भावनांच्या आहारी जाण्यासारखं.

सर्वंकष विचार

आपण जी शाखा, करिअर आणि त्या अनुषंगाने कोर्सेस निवडू पहात आहात त्यांचा सर्वबाजूंनी विचार करा. त्यात काय चांगले आणि वाईट, फायदे आणि तोटे, बाजूने आणि विरोधातील विचार, मत मतांतरे जाणून घ्या. मला हे आत्ता आकर्षक वाटतंय, परंतु आयुष्यात दूरवर त्याचा काय परिणाम होईल? मागचा पुढचा विचार करून सारासार विवेकबुद्धी जागृत ठेऊन असा सर्वंकष विचार तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी साहाय्य करतो.

पर्यायांचा विचार

‘अ’ प्लॅन चालला नाही तर ‘ब’ आहेच आणि आपल्या बाराखडीत तर अनेक अक्षरे आहेत. अर्थात आपण एकाच वेळेस दोन ते तीन पर्याय तयार ठेवायला हवे. एकच एक पर्याय ठेऊन आपण आपलेच मार्ग संकुचित करतो. मला हे जमलं नाही तर मग काय हा विचार निर्णय घेताना केलेला असावा.

वास्तविकता

अनेक वेळा खोट्या भ्रमात राहून निर्णय घेतला जातो आणि मग केवळ पश्चात्तापच करत बसावे लागते. त्यापेक्षा आपली बलस्थान, क्षमता, कौशल्य लक्षात घेऊनच निश्चय केला जावा. निवड करताना स्वतःला जे जमणार नाही ते दूर ठेवावं. अनेक प्रकारचे भान जागृत ठेवलं तर घेतलेला निर्णय हा योग्य ते यश देऊन जातो. अपेक्षा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामधील अंतर लक्षात घेतलेलं बरं.

लवचिकता

महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील लवचिकता. एकदा घेतलेला निर्णय मी बदलत नसतो असं म्हणणं कितीही मोठं वाटत असलं तरी परिस्थितीनुसार आपले निर्णयाचा पुनर्विचार करणं तितकंच गरजेचं. अशी ही निर्णय प्रक्रिया विचारपूर्वक अवलंबायला हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT