एज्युकेशन जॉब्स

‘अ’ ऑनलाइनचा : अधोरेखित करा आपला अभ्यास

अभ्यासाचे वाचन करताना केवळ नजर फिरवून वाचल्यासारखे करणे फायदेशीर होणार नाही. आपण जे वाचत आहोत ते लक्षात ठेवणे आणि त्याच बरोबरीने त्या शब्दांकडे आपले लक्ष केंद्रित होणे गरजेचे असते.

डॉ. उमेश देवदत्त प्रधान

अभ्यासाचे वाचन करताना केवळ नजर फिरवून वाचल्यासारखे करणे फायदेशीर होणार नाही. आपण जे वाचत आहोत ते लक्षात ठेवणे आणि त्याच बरोबरीने त्या शब्दांकडे आपले लक्ष केंद्रित होणे गरजेचे असते. पेन्सिलचा उपयोग आणि वाचन हे बरोबरीने व्हायला हवे. वाचन करताना महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत पुढे जायचे आहे. अधोरेखित करताना पेन्सिलचा उपयोग करतच वाचत जायचे. प्रत्येक वाक्यात अत्यंत महत्त्वाचे असे content words or thought words असतात. काही शब्द हे केवळ व्याकरणातील वाक्य पूर्ण करण्यासाठीचे शब्द असतात. विचार दर्शक (content words) असे शब्द हे अधोरेखित केले जावेत. असे शब्दच त्या विषयातील मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करणारे असतात. अशा शब्दांकडेच विषेश लक्ष देणे गरजेचे आहे. असे अधोरेखित केलेले शब्द, वाक्य आपले लक्ष केंद्रित करायला मदतच करतात.

अधोरेखित करण्याचे विविध प्रकार

अधोरेखित करण्यामध्येही प्रकार करता येतील. जे जास्तीचे महत्त्वाचे आहे असे मुद्दे दोन वेळा अधोरेखित करता येतील. काही मुद्दे हे एकाच रेषेने अधोरेखित करता येतील तर काही मुद्दे नागमोडी रेषेने अधोरेखित करता येतील. काही मुद्याकरता रंगीत पेन्सिल वापरता येईल. काही वेळेस दुहेरी अधोरेखन करता येईल. एकदा अशा पद्धतीने अधोरेखित केलेले प्रकरण केवळ पहा अनेक मुद्दे तुम्हाला सहज लक्षात राहतील.

पुढील वेळी वाचताना संपूर्ण परिच्छेद आणि प्रकरण वाचत राहण्याऐवजी केवळ हे अधोरेखित केलेले शब्द जरी वाचले तरी आपला आवश्यक भागाचा अभ्यास तयार होणार आहे. एखाद्या प्रकरणाची उजळणी करण्यासाठी या अधोरेखित केलेल्या शब्दांचा नक्कीच उपयोग होइल. पुढील वेळेस केवळ हे मुद्द्यांचे स्पष्टीकरण दिलेत की झाले उत्तर तयार.

अधोरेखित करण हे वाचनातील लक्ष विचलीत होऊ नये यासाठी पण आवश्यकच आहे. असे केलेले वाचन हे जास्त अर्थपूर्ण, लक्षवेधी होईल. तर अभ्यास करायचा म्हणजे काय करायच तर मुद्दे अधोरेखित करत बसायचे आणि ते वेगळे लिहून काढायचे म्हणजे झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT