Civil Engineering Sakal
एज्युकेशन जॉब्स

हटके : स्थापत्य अभियांत्रिकी करिअरचा शाश्वत मार्ग...

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ व ‘स्थापत्य अभियंता’ यांची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. विजया प्रधान

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ व ‘स्थापत्य अभियंता’ यांची एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे. स्थापत्य अभियंत्याला खासगी क्षेत्रासह शासकीय सेवेतही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या शाखेतून पदवीप्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्व:कर्तृत्वाच्या आणि रोजगाराच्या संधींना न्याय देता येतो.

दहावी आणि बारावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी स्थापत्य अभियांत्रिकीच्या चार वर्षाच्या बी.टेक अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ शकतात.

स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी म्हणून ज्या काही गोष्टी आपण शिकत असतोच, त्या गोष्टी सहजपणे आपल्या आजूबाजूला पाहता येतात. यामध्ये इमारतीचे बांधकाम, रस्ते, पूल अशाप्रकारच्या अनेक बाबींचा समावेश होतो.

त्याचप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा विषय येतो, तर या अभ्यासक्रमाच्या शिक्षणानंतर नोकरी व व्यवसायासाठी केवळ शहरातच जाण्याची आवश्यकता राहत नाही. आपण जिथे आहोत तिथे अगदी ग्रामीण भागातही आपण स्व:तचा व्यवसाय सुरू करू शकतो.

स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना गणित, विज्ञान, भाषा, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण, पायभूत सुविधा, दळणवळण, वास्तुरचना आणि संरचना, नकाशे बनवणे, नगर नियोजन, भूगर्भशास्त्र, जलस्रोत आणि जलगती शास्त्र, जलविद्युत प्रकल्प, काँक्रीट, बांधकाम तंत्रज्ञान, आधुनिक सर्वेक्षण, भूकंप प्रतिकारकता, निविदा आणि करार, गुणवत्ता आणि सुरक्षितता, बांधकाम निगडित कॉम्प्युटर प्रणाली, मोजमाप कसे करावे इत्यादी विषयांचा अभ्यास करावा लागतो.

स्थापत्य अभियंत्यांना करिअरच्या सुरुवातीचा काळात मिळणारा मोबदला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या तुलनेत कमी वाटतो; मात्र, या क्षेत्रातील अनुभव मिळाला की, मोबदल्यात सातत्यपूर्ण वाढ होत जाते. या क्षेत्रात प्रत्यक्ष कामाला अधिक महत्त्व असून या क्षेत्रात सातत्याने बदल होतात, तंत्रज्ञान बदलत राहते त्यानुसार विद्यार्थ्यांनाही कायम अद्ययावत क्रमप्राप्त ठरते.

बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित वेळेत, योग्य खर्चात, सुरक्षितपणे आणि गुणवत्ता टिकवून पूर्ण करण्याचे मोठे आव्हान स्थापत्य अभियंत्यांवर असते. विविध वास्तूप्रकल्प, रस्ते, पूल, रेल्वे, विमानतळ, धरणे, बंदरे, मेट्रो, बोगदे, ऊर्जा, दूरसंचार आदी प्रकल्पांवर काम करण्याची संधी त्यांना मिळत असते.

विद्यार्थ्यांनी धाडस, चिकाटी, आत्मविश्वास, मेहनत, समर्पण, आणि चांगल्या कामासाठी लागणारा थोडा संघर्ष करण्याची मानसिक तयारी करून स्थापत्य अभियांत्रिकी या विद्याशाखेची निवड करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत जाण्याची संधी स्थापत्य अभियंत्यांना उपलब्ध आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूमी अभिलेख विभाग, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नगर रचनाकार, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आदी शासकीय विभागांमध्ये विविध पदांवर स्थापत्य अभियंत्यांची नियुक्ती केली जाते.

पाणी पुरवठा विभाग, रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, रेल्वे विभाग, कर्मचारी निवड आयोग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जल व मृदा संधारण विभाग, राष्ट्रीय शेती व विकास बँक, भाभा अणू संशोधन केंद्र इ. शासकीय ठिकाणी स्थापत्य अभियंत्यास नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

(लेखिका एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT