सातारा : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) ज्युनिअर रिसर्च फेलो या पदावरील भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी उमेदवार 12 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. शिवाय, डीआरडीओ वेबसाइटवर देखील अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. DRDO-Defence या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार GATE, NET Score, M.E/M.Tech पात्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराला वेतनश्रेणी एचआरएबरोबर 31,000 रुपये दरमहा असेल. यासाठी 22 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (drdo-recruitment-2021-apply-and-get-31000-rupees-per-month)
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) ज्युनिअर रिसर्च फेलो या पदावरील भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.
इच्छुक उमेदवार डीआरडीओ वेबसाइटवर जाऊन अर्जाचा नमुना तपासू शकतात. त्यासाठी अर्ज केलेल्या नमुन्यात नमूद केलेल्या अर्जाची एक प्रत आणि स्वत: चे प्रमाणित कागदपत्रे उमेदवारांना येथे दिलेल्या पत्त्यावर पाठवावे लागतील. The Director, Research & Innovation Centre (RIC), 5th Floor, ITM Research Park Kanagam Road, Taramani, Chennai-600113
या व्यतिरिक्त डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) प्रशिक्षकांच्या पदांवरील भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविला आहे. या भरती मोहिमेद्वारे 2021-22 या वर्षासाठी 47 पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवार अधिसूचना जारी केल्याच्या 15 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात. म्हणजे, 5 जून 2021 पर्यंत. अधिक माहितीसाठी आपण डीआरडीओ वेबसाइट www.drdo.gov.in वरही भेट देऊ शकता.
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी पास असावेत. याशिवाय उमेदवारांकडे आयटीआय डिप्लोमा किंवा प्रमाणपत्रही असावे. या पदांसाठी उमेदवारांची निवड दहावी व आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. दरम्यान, कोरोनामुळे कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही.
drdo recruitment 2021 apply and get 31000 rupees per month
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.