Teacher Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

D.Ed Course : 'डी. एड्.'ला उतरती कळा! अनुदानित विद्यालयांमध्ये अवघे 45 विद्यार्थी, 'इतक्या' संस्था झाल्या बंद

शिक्षक होऊनही नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा कल बदलल्याचे दिसून येत आहे.

तुषार सावंत

जिल्ह्यात देवगड तालुक्यातील मिठबाव, मालवण, कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे शासन अनुदानित डी.एड. कॉलेज आहेत.

कणकवली : गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरती (Teacher Recruitment) न झाल्याने जिल्ह्यात डी. एड्. अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली आहे. शिक्षक भरतीमध्ये परजिल्ह्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात (Sindhudurg) येतात; मात्र जिल्ह्यातील तरुणांनी शिक्षक पदांकडे पाठ फिरविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

परिणामी, जिल्ह्यात डी. एड.चे शिक्षण देणाऱ्या खासगी सात संस्था बंद झाल्या असून, शासन अनुदानित चार ठिकाणी सुरू असलेल्या डी. एड. अभ्यासक्रमासाठी (D.Ed Course) यंदा प्रथम वर्षासाठी एकूण ३७ विद्यार्थीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिक्षकाची नोकरी हे एक सन्माननीय कार्य आहे. मुलांना शिक्षण देणे, त्यांना घडविणे हे सोपे काम नाही. देणे, त्यांना घडविणे हे सोपे काम नाही. पूर्वी शिक्षक पदासाठी मोठी स्पर्धा होती. तेव्हा गुणवत्ता यादीत आलेली मुले शिक्षकी पेशा स्वीकारत असत; पण हे चित्र आता बदलले आहे.

शिक्षक बनायचे असते, ते स्वतःचे ज्ञान वाढवून दुसऱ्याला ज्ञानी करण्यासाठी शिक्षक किंवा गुरूचे स्थान मिळणे, ही भाग्याची गोष्ट असते. शिक्षक देखील अनेक टप्प्यांत बनता येते. काही माध्यमिक विभागांत किंवा प्राथमिक शाळेतील मुलांसाठी शिक्षक बनता येते. प्राथमिक शाळेतील शिक्षक ही सरकारी शिक्षक नोकरी मिळते.

खासगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळते. प्राथमिक शाळेतील शिक्षक घडविण्यासाठी शाळेतील राज्य शासनाकडून अनुदानित तत्त्वावर अध्यापक महाविद्यालय चालविले जाते. जिल्ह्यात देवगड तालुक्यातील मिठबाव, मालवण, कणकवली आणि सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे शासन अनुदानित डी.एड. कॉलेज आहेत.

गेल्या काही वर्षांत या डी. एड. कॉलेजमधून सरासरी ५० ते ६० विद्यार्थी शिक्षक म्हणून बाहेर पडत होते; मात्र राज्याने शिक्षक भरती केली नसल्याने अनेक पदवीधर, डी. एड. धारक बेरोजगारांनी अनेकदा आंदोलने केली. तरीही त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला नाही. यामुळे डी. एड. धारकांचे आता वय उलटून गेल्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. काहींनी पर्यायी व्यवस्थाही केली.

जिल्ह्यामध्ये प्रत्येक डी. एड. विद्यालयांमध्ये तीन ते चार शिक्षक आहेत; मात्र या शिक्षकांवर केवळ दहा ते बारा मुलांना शिकविण्याची वेळ आली आहे. पूर्वी डी.एड. साठी प्रवेश सहज मिळत नसे, तेथे गुणवत्ता यादीचा कस लागत असे, मात्र आता सहजपणे प्रवेश मिळत असतानाही प्रवेश घेण्याऱ्यांची संख्या मात्र फारच रोडावली आहे.

शिक्षक झाल्यानंतरही शिक्षकांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिक्षकांची 'टी.ई.टी.' झाल्यानंतर त्यांना पवित्र पोर्टलमधून शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. राज्यभरात आता पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती होऊ घातली आहे; परंतु या शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेले शिक्षक तयार झाले नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात दरवर्षी ३० ते ४० विद्यार्थी डी.एड. पूर्ण करून बाहेर पडत आहेत. यातील बऱ्याच जणांना नोकरी नसल्याने त्यांनी पर्याय व्यवस्था स्वीकारली आहे. शिक्षक भरतीबाबत शासनाचे वेळकाढू धोरण कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहेत.

पुन्हा परजिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनाच संधी

मध्यंतरी परजिल्ह्यातील शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये पाठविण्यात आल्याने येथील अनेक शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त आहेत. आता जरी पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यातील शिक्षक भरती झाली, तरी यात स्थानिकांचा वाटा अल्पच असणार आहे. याचे कारण शिक्षक म्हणून प्रशिक्षित तरुणांची संख्या अत्यल्प झाल्याने पुन्हा एकदा परजिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांना सिंधुदुर्गात संधी मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात शिक्षक भरती होत नसल्याने डी.एड. किंवा बी.एड. झालेले विद्यार्थी बेरोजगार होत आहेत. नोकरी मिळत नसल्याने आता डी. एड. कडे वळणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील खासगी विनाअनुदानित डी.एड. कॉलेज बंद झाल्याची स्थिती आहे. शिक्षक होऊनही नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा कल बदलल्याचे दिसून येत आहे.

- प्रा. सुशील शिवलकर, डायट

जिल्ह्यातील खासगी अध्यापक महाविद्यालये बंद झाली आहेत. शासन अनुदानित डी. एड. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीच मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती केवळ एकच डी. एड. कॉलेज ठेवून, यासाठी लागणारा दर्जेदार स्टाफ द्यावा. उर्वरित स्टाफला शिक्षक पदांमध्ये विलीन करावे. जेणेकरून अनुदानित एक तरी डी. एड. महाविद्यालय चांगल्या पद्धतीने चालविता येईल. त्यामुळे जिल्ह्यात एकच दर्जेदार डी. एड. महाविद्यालय असावे.

- डी.एम. नलावडे, सचिव, कणकवली शिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT