education department 
एज्युकेशन जॉब्स

वैज्ञानिक दृष्टिकोनाला हरताळ...

उद्दिष्टपूर्तीलाच दिला जातोय खो; शिक्षण विभागाची उदासीनता बाल वैज्ञानिकांच्या मुळावर

हफीज घडीवाला

कंधार : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या हेतूने शिक्षण विभागाने अभ्यासक्रम आराखड्यात प्रयोगशाळांचा समावेश केला. "चला शिकू या प्रयोगातून विज्ञान" अशा नावाखाली उपक्रम सुरू केले. प्रयोगशाळांतून मुलं विज्ञानभिमुख व्हावीत, त्यांच्यात चौकसपणा यावा, त्यांची जिज्ञासावृत्ती वाढावी, हा उद्देश असतो. परंतू या उद्देशाला खुद्द शिक्षण विभागाकडूनच हरताळ फासले जात असल्याचे चित्र आहे. प्रयोगशाळांतून उद्दिष्ट्यपूर्तीलाच खो दिला जात असल्याने त्या शोभेच्या वस्तू बनत चालल्या आहेत. प्रयोग होतात की नाही, झाले तर किती होतात याबाबतही अनभिज्ञता दिसून येते. एकूणच शिक्षण विभागाची उदासीनता बालवैज्ञानिकांच्या मुळावर येत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मानव विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील १६ पैकी नऊ तालुक्यात बालभवन मंजूर करण्यात आले. यात कंधारचा समावेश नाही. शिक्षण विभागाने येथील मुलांमध्ये गुणवत्ता नसल्याचा जावई शोध कुठून लावला समजत नाही. तालुक्यात पेठवडज, काटकळंबा, बाचोटी आणि कंधार शहरात दोन (एक मुलांचे - एक मुलींचे) असे पाच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा आहेत. बाचोटीच्या शाळेत प्रयोगशाळा असून दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. काटकळंबा येथील शाळेत विज्ञान शिक्षक नाही. पेठवडज येथील शाळेत प्रयोगशाळा, विज्ञान शिक्षकाची नेमणूक आहे. परंतू पुरेसे साहित्य, उपकरणे उपलब्ध नाहीत.

शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांची स्थिती पेठवडज, काटकळंबा, बाचोटी येथील शाळांच्या अगदी विपरीत आहे. पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असलेल्या मुलांच्या हायस्कुलमध्ये विद्यार्थी संख्या केवळ सात आहे. यावरून येथील प्रयोगशाळा कशी असेल, प्रयोग कसे होत असतील याचा विचारच न केलेला बरा. मुलींच्या हायस्कुलची स्थितीही या पेक्षा वेगळी नाही. पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत आठवी ते दहावीला केवळ सहाच मुली आहेत. एकेकाळी नामांकित असलेल्या या दोन्ही शाळा अक्षरशः नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांमध्ये बोटावर मोजण्या एवढेच विद्यार्थी आहेत. मग प्रयोग आणि प्रयोगशाळेचा विषयच कालबाह्य ठरतो.

अर्ध्याच्यावर शाळांमध्ये प्रयोगच नाहीत

तालुक्यात कंधार शहरात दोन आणि बाचोटी, काटकळंबा, पेठवडज येथे प्रत्येकी एक जिल्हा परिषद हायस्कुल आहे. तर पानशेवडी, वहाद, गोणार व शिराढोण येथे उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये प्रयोगशाळा असून दोन - चार शाळा सोडल्या तर बाकी ठिकाणी त्या गुंडाळून ठेवण्यात आल्या आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील प्रयोगशाळांची अवस्था जिल्हा परिषदपेक्षाही खराब आहे. ९० शाळा पैकी अर्ध्याच्यावर शाळांमध्ये प्रयोगच होत नसल्याची माहिती आहे. काही शाळेत त्या धूळखात पडल्या आहेत तर काही शाळेत फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. काही बोटावर मोजण्या इतक्या शाळांमध्येच नियमित प्रयोग होतात.

शाळांमध्ये प्रयोगशाळेची तपासणी व्हावी

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी महसूल विभागाकडून मोहीम राबवून जिल्ह्यातील बोगस विद्यार्थी संख्येचा पर्दाफाश केला होता. त्या वेळी हजारो विद्यार्थी बोगस असल्याचे पुढे आले होते. या मोहिमेनंतर पटसंख्येत पारदर्शकता आली. अशीच एखादी मोहीम महसूल विभागाने हाती घेऊन जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रयोगशाळा आहेत की नाही, असल्या तर प्रयोग होतात का, तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक आहे का, याचा छळा लावणे गरजेचे आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मग ते जिल्हा परिषदेच्या असोत की खाजगी व्यवस्थापनाच्या असोत, त्यामध्ये प्रयोगशाळा आहेत की नाही, प्रयोग होतात की नाही याची माहिती आमच्याकडे नसते. आम्ही सातवीपर्यंतची जबाबदारी पाहतो. तालुक्यात चार उच्च प्राथमिक शाळा असून तेथे नियमित प्रयोग होतात.

- संजय येरमे, प्रभारी बीओ, कंधार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट; आता 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Devendra fadnavis: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला देवेंद्र फडणवीसांचे समर्थन, म्हणाले- हा तर देशाचा इतिहास

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT