hsc 
एज्युकेशन जॉब्स

बारावीनंतर काय? मेडिकल, इंजिनिअरिंगसह करिअरसाठी अनेक मार्ग

सकाळ डिजिटल टीम

वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची अनेकांची इच्छा असते.पण याशिवाय इतर अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थी करिअर करू शकतात.

दहावीनंतर बारावीचं वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. पदवीसाठी प्रवेश घेण्यासाठी किंवा पुढे करिअरचा मार्ग ठरवताना बारावी टर्निंग पॉइंट ठरतो. दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारावीनंतर काय? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांनाही सतावत चालला आहे. बदलत्या प्रवाहात आपला पाल्य टिकून राहील का? त्यासाठी कोणता अभ्यासक्रम निवडावा लागेल, असे असंख्य प्रश्‍न पालकांना पडत आहेत. बारावीनंतर कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, त्याची माहिती जाणून घेऊया.

खरं तर करिअरची निवड करताना आपली आवड व पालकांची भूमिका या दोन गोष्टी महत्त्वपूर्ण ठऱत असतात. आज विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. आज प्रत्येकाला वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी यासारख्या क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची अनेकांची इच्छा असते.पण याशिवाय इतर अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थी करिअर करू शकतात. अशा क्षेत्रांची माहिती आपण जाणून घेऊ या.

वैद्यकीय क्षेत्र : सर्व आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा द्यावी लागते.

एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस : हे अभ्यासक्रम पाच वर्षे सहा महिन्याचे असून पूर्ण केल्यानंतर स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय किंवा रुग्णालयातही नोकरीची संधी असते.

बीडीएस : हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून पुढे एमडीएस हा अभ्यासक्रमही करता येतो.

बीएससी इन नर्सिंग : हा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीची संधी आहे.

बीव्हीएससी अँड एएच : हा अभ्यासक्रम पाच वर्षाचा असून पूर्ण केल्यानंतर जनावरांचे रुग्णालय, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरीची संधी आहे. स्वतःचा व्यवसायही करू शकता.

डिफार्म : हा भ्यासक्रम तीन वर्षांचा असून औषधनिर्मिती कारखान्यात नोकरीची संधी असते.

बीफार्म : चार वर्षांचा अभ्यासक्रम असून औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्थेमध्ये नोकरीची संधी आहे.

अभियांत्रिकी क्षेत्र : या क्षेत्रात इयत्ता दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. तर बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. यासाठी ‘सीईटी’ परीक्षा द्यावी लागते. ‘आयआयटी’ प्रवेशासाठी ‘जेईई’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते.

कृषीक्षेत्र : बारावीनंतर कृषिक्षेत्रामध्ये ॲग्रीकल्चर, फॉरेस्ट्री, फिशरीज, फूड सायन्स आदींचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.

औषध निर्माण शास्त्र : बारावीनंतर ‘डी.फार्मसी’ हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आहे. यात औषध उत्पादन, संधोधन आदीमध्ये करिअर करता येते. त्यानंतर बी.फार्म ही पदवीही घेता येते.

याशिवाय पशुवैद्यकशास्त्र, आर्किटेक्चर, पॅरामेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, मनोरंजन, संरक्षण दल यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. याचबरोबर बारावीनंतर बीबीए, बीसीए, बीसीएस यासारख्या अभ्यासक्रमांतूनही संगणकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT