Education In Foreign : शिक्षण म्हणजे करियरच्या वाटेने उचललेले एक महत्वाचे पाऊल. अनेकांना विदेशात शिकायची प्रबळ इच्छा असते. यासाठी विद्यार्थी अगदी दहावी बारावीपासून तयारीला लागतात. तुम्हालाही विदेशात शिकायचे असेल तर या काही टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.
तुम्हाला भारताबाहेर शिकायला जायचे असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला कुठल्या देशात जायचे आहे तो देश आणि कॉलेज निवडावे लागेल. भारताबाहेरचे कॉलेज निवडण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती असायला हवी.
सगळ्यात आधी तुम्हाला कुठले क्षेत्र निवडायचे आहे ते ठरवा. कोर्स किती काळासाठी असेल, तुमच्या करियरसाठी तो फायद्याचा ठरेल का याचा विचार करा. त्यानंतर तुमच्यासाठीचे बेस्ट कॉलेज निवडा.
यूएस, अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांसारख्या ज्या कुठल्याही देशात तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो देश शॉर्टलिस्ट करा. शिवाय तुम्ही ज्या देशातील कॉलेज निवडताय ते तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यास समर्थ आहे की नाही हे लक्षात घ्या.
ज्या कॉलेज, युनिव्हर्सिटीची लिस्ट तुम्ही तयार केली आहे त्यातील चांगलं कॉलेज निश्चित करण्यासाठी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी रँकिंग चेक करा. रँकिंग इंस्टिट्यूट आणि देशानुसार वेगवेगळी असू शकते. तेव्हा तुमच्या पातळीवर रिसर्च करणे कधीही योग्य. ही रँकिंग कॉलेजवर नाही तर युनिव्हर्सिटीवर आधारित असते.
विदेशात शिक्षण म्हणजे खर्च फार मोठा असणार आहे. तेव्हा यासाठी योग्य बजेट बनवणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचे असेल तर आधी बँकेशी संपर्क साधा. स्कॉलरशिपबाबत जाणून घ्या. जेणेकरून तुम्ही सहज विदेशातील कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकाल. विदेशात फक्त शिक्षणाचाच नव्हे तर खाण्याचा खर्चसुद्धा जास्त असेल तेव्हा यासाठीचा बजेट आधीच बनवणे महत्वाचे.
विदेशात शिकायला जाण्यासाठी TOEFL, IELTS, GRE, SAT, GMAT,ACT यांसारख्या परीक्षा द्याव्या लागतात. या परीक्षा विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे टॅलेंट आणि टेक्निकल स्किल्स ओळखण्यासाठी घेतल्या जातात. जे विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना विदेशीत शिकण्यासाठी संधी सहज मिळते. बहुतांश विद्यार्थी TOEFL परीक्षेच्या माध्यमातून विदेशात जातात.
विदेशात शिकायला जायचे असल्यास एका कॉलेजमध्ये नाही तर दोन ते तीन कॉलेजमध्ये अप्लाय करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.