पुणे-मुंबईत उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशातच विदेशातही शिक्षण घेता येते; तसेच एक चांगले करिअर घडविता येते.
सोलापूर : पुणे- मुंबईत (Pune-Mumbai) उच्च शिक्षणासाठी (Higher education) लागणाऱ्या पैशातच विदेशातही शिक्षण (Education) घेता येते; तसेच एक चांगले करिअर घडविता येते, हे सोलापुरातील आदित्य नगरातील प्रतीक सुतार याने सिद्ध करून दाखवले आहे. प्रतीकने दहावीपासूनच विदेशात शिक्षण घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्याने पासपोर्टची तयारीदेखील केलेली होती. त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. नंतर अकरावी व बारावीचे शिक्षण एच. आर. चंडक प्रशालेत पूर्ण केले. नंतर विदेशात जाण्याचे ध्येय गाठण्यासाठी त्याने पदवी शिक्षणातच योग्य पर्याय शोधण्यास सुरवात केली. तेव्हा पुणे व मुंबईमध्ये शिक्षण घेऊन देखील मार्गदर्शन मिळत नसल्याचे त्याच्या लक्षात आले.
यावेळी त्याला ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सेल फॉर ऍब्रॉड या कक्षाची माहिती मिळाली. तेव्हा याच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना या कक्षाने विदेशातील शिक्षण व करिअरसाठी असलेल्या परीक्षा व त्याचे अभ्यासक्रम याची माहिती करून दिली. आयईएलटीएस परीक्षेची तयारी त्याने केली. पुणे व मुंबई येथे शिक्षण घेतले असते तर या पद्धतीचे मार्गदर्शन तर दूरच पण निवास व भोजनाचा खर्च अधिक झाला असता, तो सोलापुरात शिक्षण घेतल्याने टाळता आला. नंतर प्रतीकने जर्मनीतील शिक्षणाचा पर्यायदेखील शोधला. भारतातील पदव्युत्तर शिक्षण, यूएसए किंवा यूकेमधील शिक्षण याचा प्रतीकने अभ्यास केला. तेव्हा जर्मनीतील शिक्षणाचा खर्च अत्यंत कमी असल्याचे आढळले. त्याने जर्मनीतील सिगन विद्यापीठात प्रवेश घेतला.
जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यास स्वागताची आर्थिक मदत केली जाते. तसेच काही काळ जॉबची रक्कम जमवून पुन्हा पुढील शिक्षण पूर्ण करता येते. तसेच यूएसए किंवा यूकेच्या तुलनेत शैक्षणिक शुल्कदेखील कमी असल्याचे आढळले. तेथील अनेक विद्यार्थ्यांनी या नियमांचा उपयोग करून त्यांच्यावरील एज्युकेशन लोनची परतफेड शिक्षण चालू असतानाच केली. त्यामुळे तेथील शिक्षण जवळपास केवळ निवास व भोजनाच्या खर्चात होऊ शकते, असे तेथील भारतीय विद्यार्थ्यांचा अनुभव आहे.
ठळक बाबी
सोलापुरात इंजिनिअरिंगच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा
पुणे व मुंबईतील शिक्षणाच्या खर्चाच्या तुलनेत नगण्य खर्च
ऍब्रॉड सेलचे मार्गदर्शन विदेशी करिअरसाठी मोलाचे
अमेरिका व इंग्लंडच्या तुलनेत जर्मनीतील शिक्षण अधिक कमी खर्चाचे
कमवा व शिका धोरणाची जर्मनीतील शिक्षणात तरतूद
विदेशात शिक्षण घेत असताना आपण योग्य असे पर्याय शोधले तर आपल्याला खूप चांगले नियोजन करून कमी खर्चात शिक्षण मिळू शकते. त्यासाठी आधी विदेशी शिक्षणाच्या सुविधांचा अभ्यास उपयोगी पडतो. सोलापुरातच ऍब्रॉड सेलची मदत त्यासाठी उपयोगाची ठरली.
- प्रतीक सुतार, सिगन विद्यापीठ (जर्मनी)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.