सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेतील (Civil Services Exam) विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून नागरी सेवा परीक्षार्थींना परीक्षेसाठी आणखी एक संधी देण्यासाठी केंद्र सरकार तयार झाल्याचे समजते. सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका देखील केली आहे.
जगभरात कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. शैक्षणिक परीक्षांबरोबरच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणाऱ्या विविधा स्पर्धा परीक्षांनाही याचा फटका बसला होता. याचा परिणाम अनेक परीक्षार्थींवर देखील झाला. परीक्षा न देता आल्यानं अनेकांच्या अधिकारी होण्याच्या आशा कायमच्या मावळल्या होत्या. कारण, वयाच्या अटीमुळे अनेकजण परीक्षा देण्याच्या स्पर्धेतून बाद झाले होते. मात्र, अशा कोरोनामुळे संधी गेलेल्या आणि वयाच्या अटीतून बाद झालेल्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे, त्यामुळे अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
नागरी सेवा परीक्षेतील उमेदवार रचना सिंह यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर काही दिवसांपासून या परीक्षांबाबत चर्चा सुरु होती. मात्र, यावरती कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे २०२० च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेकरिता काही परीक्षार्थी उपस्थित राहु शकले नाहीत, तर काही परीक्षार्थी कठीण परिस्थिमुळे त्यांना केंद्रापर्यंत पोहोचता आले नाही, असे नमूद केले आहे.
करोनामुळे युपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या परीक्षार्थीं वयाच्या अटीमुळे पुन्हा संधी मिळू शकत नाही, त्यामुळे एक संधी देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परीक्षार्थींना पुन्हा एक संधी देण्यासंदर्भात युपीएससी आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली. आता परत कोर्टात सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2020 चे आयोजन 4 ऑक्टोबर 2020 मध्ये करण्यात आले होते. या आधी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितले होते की, नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये ज्या परीक्षार्थींना शेवटची संधी आहे, अशा उमेदवारांना वयाची अट न ठेवता ती वाढवून आणखी एक संधी देण्यात यावी, परंतु यावर केंद्र सरकारने आपले मत मांडताना असे सांगितले की, असे केल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात, असे नमूद करण्यात आले होते.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.