mandar kulkarni writes student career oriented skill sakal
एज्युकेशन जॉब्स

कौशल्य आहे तुमच्यापाशी...

‘‘मला एम.एस. करायचंय ग्रॅज्युएशन झाल्यावर अमेरिकेत जाऊन. बीई करणार आणि मग एमएस...’’ गौरव सांगत होता. साधारण बारावीतल्या गौरवची पुढची दिशा पक्की होती.

मंदार कुलकर्णी

‘‘मला एम.एस. करायचंय ग्रॅज्युएशन झाल्यावर अमेरिकेत जाऊन. बीई करणार आणि मग एमएस...’’ गौरव सांगत होता. साधारण बारावीतल्या गौरवची पुढची दिशा पक्की होती. ग्रेटच. कुटुंबात अशाच मार्गानं कुणाकुणाची करिअर उत्तम झाल्यानं आणि त्याच्यासाठी तोच मार्ग आवडताही असल्यानं त्याची दिशा तशी असायला हरकत नव्हतीच;

‘‘मला एम.एस. करायचंय ग्रॅज्युएशन झाल्यावर अमेरिकेत जाऊन. बीई करणार आणि मग एमएस...’’ गौरव सांगत होता. साधारण बारावीतल्या गौरवची पुढची दिशा पक्की होती. ग्रेटच. कुटुंबात अशाच मार्गानं कुणाकुणाची करिअर उत्तम झाल्यानं आणि त्याच्यासाठी तोच मार्ग आवडताही असल्यानं त्याची दिशा तशी असायला हरकत नव्हतीच; पण ‘जीआरई’चा अभ्यास सुरू असेलच, असं म्हटल्यावर त्याचं उत्तर होतं, ‘‘ते बघू की. अजून वेळ आहे त्याला.’’

सविताला नववी-दहावीपासूनच हॉटेल मॅनेजमेंटमध्ये रस वाटतो आहे. शेफ व्हायचं आणि कुठल्या तरी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करायचं हे तिचं पक्कं आहे...पण ‘‘आत्ता घरी स्वयंपाकात मदत करत असशीलच ना? किंवा काही छान प्रयोग वगैरे...’’ असं म्हटलं, की मॅडमचं उत्तर : ‘‘अजून वेळ आहे. ॲडमिशन मिळाली. की करीनच!’’ सागरनं खूप स्पर्धा परीक्षा देऊन एकदम जिल्हाधिकारी व्हायचं ठरवलं आहे; पण ‘रोजचा पेपर वाचतोस ना’ या प्रश्नावर त्याचं उत्तर नकारार्थी आहे. प्रवीणला एमबीए करायचं आहे; पण ‘सगळे मित्र मिळून काही तरी करा,’ असं सांगितलं, तर त्याला ते मात्र जमत नाही.

दोस्तहो, ही अशी काही उदाहरणं तुम्ही बघितली असतील. काही उदाहरणांत तुम्ही स्वतःही बसत असाल. सध्या करिअरच्या कित्ती तरी मार्गांचा अक्षरशः स्फोट दिसतो आहे आणि काही जणांनी करिअरचे मार्ग ठरवले आहेत, काही जण विचार करताहेत; पण त्यांच्यासाठी आवश्यक त्या कौशल्यांचा विकास ते करत आहेत का असा प्रश्न विचारला तर उत्तर सकारात्मक येत नाही. तुम्हाला समजा मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करावंसं वाटतं तर तुम्ही कोरोनाविषयक जी माहिती विविध ठिकाणी येते, ती वाचता का, तिचं तुमच्या परीनं विश्लेषण करता का? तुम्हाला समजा वैद्यकीय शिक्षणात रस असेल, तर त्यासाठी कित्येक तास अभ्यास करावा लागतो, उभं राहावं लागतं मग त्यासाठी आवश्यक शारीरिक तयारी तुम्ही करता का? प्राध्यापक व्हायचं असेल, तर वक्तृत्व, सार्वजनिक संवाद सुधारण्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी करता का?

...या प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच विचारून बघा. करिअरसाठी एकीकडे तुम्ही माहिती घेत असता, कुणाला भेटत असता, गुगलवर शोध घेत असता हे उत्तमच; पण त्यासाठी अनेक कौशल्यंही लागतात. अनेकदा ती नसल्यामुळे करिअर मध्येच सोडावं लागतं, किंवा ही कौशल्यं आधीच विकसित केली असती तर जास्त बरं झालं असतं असं वाटायला लागतं. त्यामुळे काही अगदी पायाभूत कौशल्यांचा विकास दहावी-बारावी किंवा अगदी त्या आधीपासूनच केला पाहिजे. अगदी सोपी कौशल्यं जर आधीच विकसित केली, तर नंतरची करिअरची वाट अतिशय सोपी होण्याची शक्यता असते. इंग्लिशवर प्रभुत्व, वक्तृत्व, लिहिण्याची सवय, वेळेचं व्यवस्थापन, समूहचर्चा अशी किती तरी सॉफ्ट स्किल्स अतिशय महत्त्वाची असतात. तुम्ही करिअर कोणतंही करा, काही विशिष्ट ‘स्किल्स’ तुमच्या ‘बकेट’मध्ये पाहिजेतच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT