पुणे - इयत्ता अकरावीच्या चौथ्या विशेष फेरीची निवड यादी शनिवारी (ता.२६) जाहीर होणार आहे. या निवड यादीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील ३२६ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश फेरीअंतर्गत सध्या चौथी विशेष फेरी सुरू आहे.
ही फेरी झाल्यानंतर या प्रवेश फेरीत दहावीची पुरवणी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. दरम्यान, शनिवारी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.
‘कॅप’ अंतर्गत प्रवेशाची आकडेवारी -
- प्रवेश क्षमता : १,००,२९६
- प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी : ६५,२२७
- रिक्त जागा : ३५,०६९
शाखानिहाय झालेल्या प्रवेशाची आकडेवारी -
शाखा : ‘कॅप’ अंतर्गत : इन हाऊस कोटा : अल्पसंख्याक कोटा : व्यवस्थापन कोटा
कला : ६,३१९ : ३७१ : १७० : १३९
वाणिज्य : २४,३२५ : १,५४५ : १,१५९ : ५६४
विज्ञान : ३२,८९२ : २,०२१ : १,२९३ : ९०४
व्यवसाय अभ्यासक्रम : १,६९१ : ४३ : ४६ : १८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.