admission esakal
एज्युकेशन जॉब्स

Eleventh Admission : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावीच्या तब्बल ६७ टक्के जागा रिक्‍त

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - आयटीआय व तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाची निवड करणाऱ्या, तसेच उच्च शिक्षणातील क्षेत्र निश्चित करून प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी अकरावी बाहेरून करत १७ नंबरचा अर्ज भरून बारावी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. म्हणूनच, इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत ऑगस्ट सुरू झाला तरीही तब्बल ६६.६८ टक्के जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या अंतर्गत ३४२ महाविद्यालयांमधील एक लाख २० हजार १६५ जागांसाठी एक लाख एक हजार ४८९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत (कॅप) एक लाख एक हजार ४६८ जागा उपलब्ध असून त्यातील केवळ ३२ हजार ९२६ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, तब्बल ६८ हजार ५४२ जागा रिक्त आहेत.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या प्रवेशाची पहिली विशेष फेरी सुरू आहे. परंतु, तिसऱ्या फेरीनंतर व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यांमधील जागा विशेष फेरीसाठी प्रत्यार्पित होतात. त्यामुळे ‘कॅप’अंतर्गत प्रवेशाच्या रिक्त जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

क्लासेसशी ‘टाय-अप’

तुलनेने लहान आणि गुणवत्ता नसलेल्या काही महाविद्यालयांचा कट ऑफ अचानकपणे वाढलेला दिसत आहे. अशा महाविद्यालयांनी खासगी शिकवणी वर्गांसमवेत (कोचिंग क्लास) करार केलेले आहेत. चांगले गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी जेईई, नीट या प्रवेश परीक्षांची तयारी करत असतात. ही मुले नियमित महाविद्यालयात जाण्यापेक्षा लहान महाविद्यालयांत मिळणाऱ्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशास नकार देतात.

अनेक ठिकाणी जागा रिक्त

नामांकित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याने विद्यार्थी-पालक ‘टाय-अप’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे अनेक चांगल्या महाविद्यालयांच्या ५० ते ६० टक्के जागा अद्यापही रिक्त आहेत. याशिवाय खासगी शिकवणी वर्गाची संस्कृती फोफावत असल्यामुळे विद्यार्थी-पालक क्लासेसच्या वेळेनुसार सोयीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत.

याशिवाय विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पुरेशी संख्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थी विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेशास नकार देत आहेत. म्हणून अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहत असल्याचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी सांगितले.

जागा रिक्त राहण्याची कारणे

  • आयटीआय, तंत्रनिकेतन पदविका अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाला वाढती पसंती

  • प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेशाच्या जागांची संख्या अधिक

  • नामांकित महाविद्यालयातच प्रवेशाबाबत आग्रह

  • पसंतीचे महाविद्यालय मिळत नसल्याने असंख्य विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाबत नाराज

  • शहराबाहेरील महाविद्यालयांना मिळतीये पसंती

  • ‘टाय-अप’वाल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल

  • दहावीनंतर अकरावी बाहेरून करून, बारावीला १७ नंबरचा अर्ज भरून बसण्याला पसंती

अनेक विद्यार्थी घराजवळील महाविद्यालयात प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. तर, काही विद्यार्थी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळेल, या अपेक्षेने प्रतीक्षेत आहेत. याशिवाय दहावीनंतर तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम केल्यास अभियांत्रिकी शिक्षणाची दालने सहज खुली होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाकडे वाढता कल आहे. याशिवाय अनेक विद्यार्थी जेईई, नीट, सीईटी परीक्षांवर लक्ष केंद्रित करत असल्याने ते अकरावीला प्रत्यक्ष प्रवेश घेण्यापेक्षा १७ नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा देतात.

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT