अवेकनिंग युवर ब्लिस : आत्मशोधातून परमानंद प्राप्ती’ हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. esakal
एज्युकेशन जॉब्स

Sakal Book Publish : आत्मशोधाचा मार्गदर्शक : 'अवेकनिंग युवर ब्लिस'

Self Discovery : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सकाळ प्रकाशनाचे पुस्तक वाचकांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

Sakal Book Publish : अध्यात्माच्या वाटेवरील प्रवास सुरू करणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरणारे ‘अवेकनिंग युवर ब्लिस : आत्मशोधातून परमानंद प्राप्ती’ हे महत्त्वाचे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तापासून म्हणजे शुक्रवारपासून (ता. ९) या पुस्तकासाठी वाचकांना नोंदणी करता येणार आहे.

शरीर आणि मनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने प्रवास सुरू होण्यासाठी आत्मज्ञानाची आणि चिरंतन परमानंदाची गरज असते. या आत्मशोधाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गुरूच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

पण ज्यांना गुरू मिळाला नाही किंवा ज्यांना हा मार्ग स्वतः जाणून घेऊन आत्मविकास साधायचा आहे, त्यांच्यासाठी ‘अवेकनिंग युवर ब्लिस : आत्मशोधातून परमानंद प्राप्ती’ हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.

मूळ परमेश्वरापासून जीवांपर्यंत सृष्टी कशी तयार झाली, हा या पुस्तकातील पहिला विभाग आहे; तर आनंदस्वरूप परमात्म्याला शास्त्रशुद्ध मार्गाने कसे प्राप्त व्हावे, याचे मार्ग दुसऱ्या भागात सांगितले आहेत. या दोन्ही विभागांचे लेखन ज्येष्ठ साहित्यिक आणि अध्यात्म श्रीमद् भगवद्‍गीतेचे अभ्यासक, निरूपणकर्ते राजेन्द्र खेर यांनी केले आहे.

तिसऱ्या विभागात वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या दहा गुरूंचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन आहे. हे पुस्तक २० मेपर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल.

योगीजनांमधे प्रचंड ऊर्जा व अमर्याद स्वरूपाचे ज्ञानभांडार असते. नैतिक मूल्यांचे अधिष्ठान असल्याने योगीजनांकडून ऊर्जेचा व ज्ञानाचा वापर स्वार्थ साधण्यासाठी केला जात नाही.

-श्री. एम, आध्यात्मिक गुरू

या गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंह भारती महाराज, ‘शारदा ज्ञानपीठम्’चे पं. वसंतराव गाडगीळ, आध्यात्मिक गुरू श्री. एम, स्वामी तेजोमयानंद, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर, कमलेश डी. पटेल (दाजी), सद्‍गुरू महामहोपाध्याय स्वामी भद्रेशदास, प्रशांत अय्यंगार, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी.

पुस्तकाविषयी अधिकची माहिती :

नाव : ‘अवेकनिंग युवर ब्लिस : आत्मशोधातून परमानंद प्राप्ती’

पृष्ठसंख्या - इंग्लिश २५६, मराठी २४०

किंमत - रु. ८९०/-

सवलतीतील किंमत - रु. ७१२/-

प्रमुख विक्रेत्यांकडे पुस्तक उपलब्ध

हे पुस्तक पुण्यातील बुधवार पेठेतील सकाळ मुख्य कार्यालयात, सकाळ प्रकाशनाच्या संकेतस्थळावर, ‘amazon’ (देशविदेशात) या ॲप व संकेतस्थळावर आणि महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात किंवा ८८८८८४९०५० या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT