Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी मुदतवाढ, एम.ई., एम.टेक., आर्किटेक्चर, बीएफएचा उद्या शेवटचा दिवस: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियांच्या अंतिम मुदती वाढविण्यात आल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) जाहीर करण्यात आले. यामध्ये एमबीए, एमएमएस, एम.ई., एम.टेक. आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमांसाठी १२ जुलैपासून सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेला २२ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, आता २७ जुलैला सायंकाळी पाचपर्यंत मुदत वाढविण्यात आल्याची माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली. याशिवाय २८ जुलैच्या सायंकाळी पाचपर्यंत कागदपत्रे पडताळणीसाठी मुदत देण्यात आल्याचे ‘सीईटी सेल’तर्फे सांगण्यात आले.

यासोबतच मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) आणि एमसीए लॅटरल इंट्रीसाठीही सीईटीने २७ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २८ जुलैच्या सायंकाळी पाचपर्यंत स्क्रुटनी करून घ्यावी लागणार आहे. एमसीए लॅटरल इंट्रीच्या अभ्यासक्रमांची ३० जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित होईल. ३१ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार आहेत. याच अभ्यासक्रमाची चार ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित होणार आहे.

मुदतवाढ मिळाल्याने एमबीए, एमएमएस आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एम.ई., एम.टेक. आणि आर्किटेक्चरमधील पदव्युत्तर व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रम एम.आर्च. आणि बी.फार्मसी (प्रॅक्टिस) या चार अभ्यासक्रमांसाठी २५ जुलैला सायंकाळी पाचपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर २६ जुलैच्या सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन केलेल्या अर्जातील त्रुटी, ई-स्क्रुटनी करता येणार आहे.

त्यानंतर २८ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित होणार असल्याचेही सीईटी सेलतर्फे सांगण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या तक्रारी, आक्षेपांवर निर्णय घेऊन त्या २९ ते ३१ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये दिसतील. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्क्रुटनी पद्धत निवडलेली आहे, त्यांना कागदपत्रे पडताळणी करून घ्यावी लागणार आहेत. २ ऑगस्टला चारही अभ्यासक्रमांच्या अंतिम गुणवत्ता याद्या प्रकाशित केल्या जाणार असल्याचेही सीईटी सेलने सांगितले.

बॅचलर ऑफ फाइन आर्ट (बीएफए) अभ्यासक्रमासाठी २५ जुलै (रात्री ११.५९) ही अंतिम मुदत आहे. २६ जुलैला सायंकाळी साडेपाचपर्यंत कागदपत्र पडताळणी करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पडताळणीसाठीच्या काळातील २१ जुलैला रविवार वगळता सकाळी साडेदहा ते साडेपाचपर्यंत प्रत्यक्ष स्क्रुटनी सेंटर सुरू राहणार असल्याचेही सीईटीतर्फे सांगण्यात आले. उच्चशिक्षण विभागांतर्गत बी.पीएड., बी.एड., एम.पीएड., एम.एड. या चार अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची मुदत २८ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

नवी मुदत अशी

एलएलबी (तीन वर्षे) या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची आज बुधवारी (ता. २४) अंतिम मुदत आहे. विशेष म्हणजे ही मुदत २० जुलैपासून पुन्हा वाढविण्यात आली होती.

पदव्युत्तर पदवी व्यावसायिक तांत्रिक अभ्यासक्रम हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (एम-एचएमसीटी) या अभ्यासक्रमांसाठी २७ जुलैच्या सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे, तर २८ जुलैच्या सायंकाळी पाचपर्यंत कागदपत्रे पडताळणी करता येणार आहेत.

बी.ई., बी.टेक.साठी आज शेवटचा दिवस

बी.ई., बी.टेक. (अंडर ग्रॅज्युएट) आणि एम.टेक. (पाच वर्षे इंटिग्रेटेड) या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणीचा २४ जुलै (सायंकाळी पाचपर्यंत) ही अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर २५ जुलैच्या सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी करावी लागणार आहे. २७ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी लागणार आहे. २८ ते ३० जुलैच्या सायंकाळी पाचदरम्यान विद्यार्थ्यांच्या आक्षेप, हरकती नोंदविता येणार आहेत. २ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT