Career In Fashion Designing esakal
एज्युकेशन जॉब्स

Career In Fashion Designing : फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे आहे? मग, जाणून घ्या 'या' कामाच्या संधी

Want a career in fashion designing? Then, explore 'these' job opportunities; मागील काही वर्षांपासून फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र सातत्याने विस्तारत आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये झालेले नवनवीन बदल आणि कामाच्या संधीमुळे तरूणाईचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Career In Fashion Designing : मागील काही वर्षांपासून फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र सातत्याने विस्तारत आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये झालेले नवनवीन बदल आणि कामाच्या संधीमुळे तरूणाईचा या क्षेत्राकडे कल वाढत आहे.

ज्यांना विविध प्रकारच्या फॅशन ट्रेंड्सचा अभ्यास करायला आणि त्याचे स्केच डिझाईन करायला आवडते, त्यांच्यासाठी करिअरचे हे एक उत्तम क्षेत्र ठरू शकते.

फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही १० वी किंवा बारावीनंतर फॅशन डिझायनिंगमध्ये डिप्लोमा करू शकता. यासोबतच तुम्ही पदवीचे ही शिक्षण घेऊ शकता.

या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला फॅशन डिझायनिंग, विविध प्रकारचे फॅशन ट्रेंड्स इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर कामाच्या कोणत्या संधी उपलब्ध होतात? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

फॅशन स्टायलिस्ट

फॅशन डिझायनिंगमधील करिअर हे वाटते तितके सोपे नाही. हे सर्वात रोमांचक आणि अवघड जॉब प्रोफाईल्सपैकी एक आहे. फॅशन डिझायनिंगसोबतच तुम्हाला कपड्यांची स्टाईल कशी करायची? याबद्दल ही जाणून घेणे महत्वाचे आहे. फॅशन डिझायनिंगसोबतच फॅशन स्टायलिस्ट म्हणून ही तुम्ही काम सुरू करू शकता.

एक फॅशन स्टायलिस्ट म्हणून तुम्ही ग्राहकाची शरीररचना, पसंती आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांचे कपडे डिझाईन करायचे असतात. तसेच, त्यांच्या पसंतीनुसार डिझायनर कलेक्शनमधून योग्य पोशाखाची निवड करणे, हे स्टायलिस्ट म्हणून तुमचे काम आहे. एक फॅशन स्टायलिस्ट म्हणून तुम्हाला मेकअप, हेअरस्टाईल, ॲक्सेसरीज आणि त्या व्यक्तीच्या एकूण लूकची खास काळजी घ्यावी लागते.

रिटेल मॅनेजर

फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा किंवा पदवी केल्यानंतर तुम्ही रिटेल मॅनेजर म्हणून ही जॉब करू शकता. फॅशन बुटिक, डिपार्टमेंटल स्टोअर किंवा कपड्यांच्या विविध प्रकारच्या ब्रॅंड्समध्ये ही नोकरी मिळवू शकता. हा एक उत्तम पर्याय असू शकतो. यासोबतच तुम्ही तुमचे फॅशन बुटिकचे दुकान देखील सुरू करू शकता.

फॅशन डिझायनर

फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वत:चे बुटिक सुरू करू शकता. यासोबतच सुरूवातीला एखाद्या मोठ्या फॅशन डिझायनरच्या बुटिकमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करू शकता.

तिथे तुम्हाला कामाचा अनुभव ही मिळेल आणि फॅशन इंडस्ट्रीमधील बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. आजकाल कपड्यांचे विविध ब्रॅंड्स येत आहेत. या ब्रॅंड्समध्ये ही तुम्ही नोकरी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

SCROLL FOR NEXT