Shangvi esakal
एज्युकेशन जॉब्स

'जात प्रमाणपत्रासाठी तिला झगडावं लागलं, शेवटी तिनं जे केलं त्याला तोड नाही'

सकाळ डिजिटल टीम

कोयंबटूर येथील आदिवासी समुदायातील विद्यार्थिनी एम शांगवीनं दुसऱ्या प्रयत्नात NEET परीक्षा उत्तीर्ण केलीय.

NEET Result 2021 : कोयंबटूर (Village Coimbator) येथील आदिवासी समुदायातील विद्यार्थिनी एम शांगवीनं (Shangvi) दुसऱ्या प्रयत्नात NEET परीक्षा उत्तीर्ण केलीय. विशेष म्हणजे, शांगवी ही 12 वीच्या सार्वजनिक परीक्षेत उत्तीर्ण होणारी तिच्या गावातील पहिली विद्यार्थिनी ठरलीय. 19 वर्षीय शांगवी मदुकराई येथे स्थायिक झालेल्या मालासर आदिवासी समाजातील (Tribal Community) आहे. या गावात 40 कुटुंबं असून तेथून बारावी उत्तीर्ण होणारी शांगवी ही पहिली विद्यार्थिनी आहे.

NEET परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात शांगवी यशस्वी झाली आणि तिनं एकूण 202 गुण मिळविले. शांगवीला समाजाचा दाखला मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर 2021 मध्ये तिला कास्टचं प्रमाणपत्र मिळालं. अनेक अडचणींचा सामना करुन शांगवीनं शिक्षण पूर्ण केलंय.

शांगवी सांगते, तिच्या वडिलांचं निधन झाल्यावर तिला समजलं, की समाजातील लोकांना किती वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे आणि लॉकडाउनशी लढा देत असलेल्या तिच्या आईनंही दृष्टी गमावलीय. स्टेटबोर्ड बुक्स वापरून आणि एनजीओच्या मदतीनं तिनं NEET परीक्षा उत्तीर्ण केलीय. या वर्षी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी कटऑफ लिस्ट 108 ते 137 च्या दरम्यान आहे. त्यामुळं शांगवीला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये (Government Medical College) मेडिकलची जागा मिळेल, असा विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT