Student Sakal
एज्युकेशन जॉब्स

जाणून घ्याल कल, तर होईल पाल्याचे भवितव्य उज्ज्वल!

पाल्यांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च ही त्यांच्या भवितव्यासाठी केलेली गुंतवणूक समजली जाते.

सकाळ वृत्तसेवा

पाल्यांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च ही त्यांच्या भवितव्यासाठी केलेली गुंतवणूक समजली जाते.

पाल्यांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च ही त्यांच्या भवितव्यासाठी केलेली गुंतवणूक समजली जाते. गुंतवणूक ही योग्य आणि अभ्यासपूर्ण असावी लागते आणि त्याचा लाभ होणार, हा विश्वासही असावा लागतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात मुलांची झालेली शैक्षणिक पीछेहाट हा पालक, शिक्षक आणि समाजाच्याही चिंतेचा विषय बनलेला आहे. मुलांना अत्यंत संयमाने या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांची आकलनक्षमता समजून योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात ‘बायजूज’ने आयोजित केलेल्या आकलन चाचणीतून. या नि:शुल्क आकलन चाचणासाठीची नोंदणी सुरू झाली आहे.

जगातील सर्वात मोठी एड-टेक कंपनी म्हणून ओळख असलेल्या ‘बायजूज’तर्फे इयत्ता चौथी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील गणित आणि विज्ञान या विषयांच्या आकलनाचा कल जाणून घेण्यासाठी Byju’s National Scholastic And Personality Test चे (बीएनएसपीटी) आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील आठ ‘बायूजज ट्युशन सेंटर्स’वर येत्या ८, ९, १५ व १६ ऑक्टोबर रोजी ही चाचणी होणार आहे.

शालेय परीक्षेतून विद्यार्थ्याची स्मरणशक्ती आणि सादरीकरण हे गुण तपासले जातात. शालाबाह्य जगामध्ये करिअर घडविताना पाल्याच्या क्षमतांची, व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण ओळख या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. ही अत्यावश्यक माहिती बुद्धिमापन चाचणीतून जाणून घेता येते. या माहितीचे अचूक विश्लेषण पाल्याच्या करिअरसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यास साहाय्यभूत ठरते.

जाणून घ्या पाल्याची बलस्थाने

पाल्यांच्या गणित आणि विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असणे अतिशय आवश्यक असते. शिवाय, या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली बलस्थाने आणि कमतरता यांची जाणीव होते व प्रगतीसाठी काय केले पाहिजे, याचेही मार्गदर्शन मिळते.

गणित आणि विज्ञानाचा करा अभ्यास

ही आकलन चाचणी एकूण दोन तासांची असून, यात गणिताचे १५, तर विज्ञानाचे १५ प्रश्न असे एकूण ३० प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जातील. निगेटिव्ह मार्किंग यात नसेल. परीक्षा इयत्ता चौथी ते दहावीच्या वर्तमान शालेय अभ्यासक्रमावरच आधारित आहे.

ही चाचणी सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, ही परीक्षा देण्यासाठी पाल्यास नजीकच्या ‘बायजूज ट्युशन सेंटर’वर जावे लागेल. ही चाचणी ऑनलाईन नाही. दिलेल्या वेळापत्रकानुसारच ही चाचणी होणार असून, या तारखांच्या व्यतिरिक्त इतर वेळी ही चाचणी देता येणार नाही. चाचणीचा निकाल चाचणी दिल्याच्या दिवसापासून ३० दिवसांनी लागेल.

विषयांची स्पष्टता

अनेकदा शालेय शिक्षणात गणित आणि विज्ञान हे विषय कच्चे राहतात. या विषयांतील संकल्पना विद्यार्थ्यांना पुरेशा स्पष्ट झालेल्या नसतात. गणित आणि विज्ञानामध्ये संकल्पना स्पष्ट असण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे हा भाग नीट समजला नसल्यास त्याचा परिणाम थेट गुणांवर होतो. आपला पाल्य अभ्यासामध्ये कोठे कमी पडत आहे, हे ‘बीएनएसपीटी’मुळे समजू शकते.

करिअर मार्गदर्शक

‘बीएनएसपीटी’मधून विद्यार्थ्यांची बलस्थाने आणि उणिवा यांची माहिती मिळते. विद्यार्थ्यांची आवड, कल आणि बलस्थाने या तिन्हींचा एकत्रित विचार करून करिअर निवडीचा मार्ग सुकर होऊ शकतो.

क्षमतांची ओळख

शाळाबाह्य जगात पाऊल ठेवताना पाल्याला आपल्या क्षमता नेमक्या आणि स्पष्टपणे माहीत असणे गरजेचे असते. ‘बीएनएसपीटी’मुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांची विश्वासार्ह माहिती मिळू शकते.

चाचणी रिपोर्टमधून काय जाणून घ्याल?

  • संपूर्ण विश्लेषण: चाचणीचे सर्वसमावेशक विश्लेषण

  • विषय विश्लेषण: गणित आणि विज्ञान विषयातली बलस्थाने

  • कौशल्य विश्लेषण: संकल्पनात्मक, उपाययोजनात्मक, धोरणात्मक इ. कौशल्यांचे विश्लेषण

  • क्षमता विश्लेषण: विद्यार्थ्यांमधील क्षमता आणि त्याचा निकाल यांच्या परस्पर संबंधांचे विश्लेषण

  • वर्तणूक विश्लेषण: निरनिरळ्या मापदंडांच्या (पॅरामीटर्स) माध्यमातून विद्यार्थ्यांचे वर्तन, क्रिया व प्रतिक्रिया यांचे विश्लेषण

BYJU's National Scholastic and Personality Test ही विद्यार्थ्यांची क्षमता, त्यांचा कल, बलस्थाने आणि व्यक्तिमत्त्व या विषयीचे सखोल विश्लेषण करणारी शास्त्रोक्त चाचणी आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी पालकांनाही मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने तज्ज्ञांनी ही चाचणी विकसित केली आहे. देशभरात दरवर्षी ही चाचणी घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

- हिमांशू बजाज, बिझनेस हेड, बायजूज ट्युशन सेंटर

अशी असेल ‘बायजूज’ची आकलन चाचणी

वेळापत्रक

  • ८ ऑक्टोबर २०२२ (शनिवार), दुपारी १२ ते २

  • ९ ऑक्टोबर २०२२ (रविवार), सकाळी १० ते १२

  • १५ ऑक्टोबर २०२२ (शनिवार), दुपारी १२ ते २

  • १६ ऑक्टोबर २०२२ (रविवार), सकाळी १० ते १२

तुमच्या सोयीचा दिवस निवडून पुण्यातील कोणत्याही ‘बायजूज ट्युशन सेंटर’वर ही चाचणी देता येऊ शकेल.

पात्रता - इयत्ता चौथी ते दहावीतील विद्यार्थी

विषय - गणित आणि विज्ञान या विषयांवर आधारित चाचणी

चाचणीची तयारी - विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा. सर्व धडे नीट वाचावेत. परीक्षेच्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार नियमित अभ्यास करावा.

बक्षिसे -

• यशस्वी होणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना एकूण तीन लाख रुपयांची बक्षिसे

• कामगिरीच्या आधारावर ‘बीटीसी’च्या ट्युशन फीसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

नोंदणीसाठी शेजारी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा अथवा पुढे दिलेल्या लिंकवर नोंदणी करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९०० ९०० २०००

अधिक तपशील व माहिती ‘बायजूज’च्या संकेतस्थळावर मिळेल

https://byjus.com/btc-scholastic-personality-test/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: छत्रपती शिवाजी महाराजांची अन् रामदासांची भेट कुठे झाली? स्थळ, ठिकाण, वेळ कोणती?; अमित शहांना कुणी दिलं ओपन चॅलेंज

Indrajeet Sawant : “अमित शहांच्या विधानामागं व्यूहरचना"; शिवराय-रामदास स्वामींबाबतकेलेल्या विधानावर इंद्रजीत सावंतांची टीका

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत निवडणूक निरीक्षक कटारा यांचे राजकीय प्रतिनिधींना मार्गदर्शन

Dombivali Assembly Election : विधानसभा निवडणूका लागताच डोंबिवलीतील रस्ते डांबराने केले गुळगुळीत

Gadchiroli Assembly Election 2024 : गडचिरोलीत स्टार प्रचारकांसाठी राजकीय पक्षांची धडपड; बाॅलिवूड, टाॅलीवूडशी संपर्क

SCROLL FOR NEXT