CET esakal
एज्युकेशन जॉब्स

‘सीईटी’साठी २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार

अकरावी प्रवेश : सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या अकरावी (FYJC) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (CET) राज्य मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन (Online) अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. राज्यातील जवळपास सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत ‘सीईटी’ परीक्षेसाठी नोंदणी केली. तर सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) यांसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. २८) अर्ज करता येणार आहे. (fyjc CET Applications submitted till August 2)

कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असून, ती ऑफलाइन स्वरूप असेल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. राज्य मंडळाने यापूर्वी २० जुलै रोजी अकरावी सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे २१ जुलैला ही अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांनी अर्ज नोंदणीसाठी नव्याने संकेतस्थळ विकसित करण्यात आले. त्यानुसार राज्य मंडळाने जाहीर केलेल्या नव्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

यापूर्वी २० आणि २१ जुलै दरम्यान परीक्षेसाठी नोंदणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून, या संकेतस्थळावर अर्ज पाहता येईल. यावेळी अर्ज पूर्णपणे सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. मात्र, यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले म्हणाले, "राज्य मंडळाच्या २०२१ च्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘सीईटी’ परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, राज्य मंडळाची २०२१ पूर्वी दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई आणि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. २८) दुपारी तीनपासून परीक्षेसाठी अर्ज करता येईल. याबाबतचा तपशील स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे."

खालील माहिती नोंदविणे गरजेचे

  • ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास)

  • पूर्वीचा मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे किंवा नव्याने नोंदविणे अनिवार्य

  • परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल, तर सामाजिक शास्त्रे विषयासाठी एक माध्यम निश्चित करावे लागेल

  • विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या किंवा कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र निश्चित करावे

  • दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करताना ‘एसईबीसी’ प्रवर्गात नोंद केलेल्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या सुधारित तरतुदीनुसार खुला प्रवर्ग किंवा ‘ईडब्ल्यूएस’ हा प्रवर्ग निवडावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT