opportunities in statistics sakal
एज्युकेशन जॉब्स

‘सांख्यिकी’तील संधींचे प्रवेशद्वार

कोणतीही गोष्ट ही संख्येमध्ये म्हणजेच आकडेवारीमध्ये मोजली जाते. संबंधित माहिती संख्येत असल्यास त्या माहितीला नेमकेपणा येतो.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

कोणतीही गोष्ट ही संख्येमध्ये म्हणजेच आकडेवारीमध्ये मोजली जाते. संबंधित माहिती संख्येत असल्यास त्या माहितीला नेमकेपणा येतो. सांख्यिकीमधील काम हे आकडेवारी संदर्भातील शास्त्रोक्त उपयोजित काम आहे, ज्यामुळे आपल्याला या माहितीचा वापर संकलन करणे, विश्लेषण करणे, वर्णन करणे आणि अनुमान काढणे यासाठी होतो.

त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये या माहितीचा अत्यंत अचूकपणे उपयोग होतो. त्यामुळे स्टॅटिस्टिक्स हे कार्यक्षेत्र आधुनिक काळामध्ये महत्त्वाचे साधन आहे. यातील तज्ज्ञ आणि प्रशिक्षित व्यक्ती प्रभावीपणे काम करून त्या क्षेत्रासाठी योगदान देऊ शकतो. संबंधित कार्यक्षेत्रासाठीचे पारंपरिक पदवी शिक्षण आहे बी.एससी. स्टॅटिस्टिक्स!

कालावधी व पात्रता

बी.एससी. स्टॅटिस्टिक्स हा बारावीनंतर तीन वर्षांचा पूर्ण वेळ पदवी कोर्स आहे. बी.एससी. स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम काही विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्ससह बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. शक्यतो एकूण गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.

इंजिनिअरिंग, मेडिकलप्रमाणे स्वतंत्र आणि अनिवार्य प्रवेशपरीक्षा नाही. तरीही काही महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट, सीयूईटी, जीसॅट, बी.एच.यू.ई.टी. आदी परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जातात.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

अभ्यासक्रम सेमिस्टर पॅटर्न स्वरूपाचा आहे. थिअरी लेक्चरसोबतच प्रॅक्टिकलमधून अध्ययनाची प्रक्रिया पार पडते. असाइन्मेंट्स, लॅबवर्क, सबमिशन, ट्युटोरियल्स हे नियमितपणे करवून घेतले जाते. स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर्स, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आणि रिसर्च प्रोजेक्ट्स हे अत्यंत काटेकोरपणे नियोजित केलेले असतात. अभ्यासक्रमात अत्यंत उपयुक्त असलेले ऐच्छिक विषय घ्यावे लागतात. प्रत्येक सेमिस्टरनंतर विद्यापीठीय स्तरावरील परीक्षा असते. सेमिनार, प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिपच्या माध्यमातून विद्यार्थी घडविला जातो.

शिकविले जाणारे विषय

या अभ्यासक्रमात डिफरन्शियल कॅल्क्युलस, इक्वेशन थिअरीज, इनइक्व्यॅलिटीज, स्टॅटिस्टिकल मेथड्स, इंडेक्स नंबर्स, डिमांड ॲनालिसिस, प्रोबॅबिलिटी थिअरी, मॅथेमॅटिकल फायनान्स, टाइम सीरिज, सॅम्पल सर्व्हे, रँडम व्हेरिएबल्स, न्यूमरिकल ॲनालिसिस, सॅम्पलिंग मेथड्स, न्यूमरिकल इंटिग्रेशन, इन्व्हर्स इंटरपोलेशन आदी विषय शिकविले जातात.

उच्च शिक्षणाच्या संधी

डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स, ॲक्चुअरी सायन्स, बायो-स्टॅटिस्टिक्स, ॲकॉनॉमेट्रिक्स, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स आदी विषयांमध्ये एम.एससी.चे शिक्षण घेता येते. त्यानंतर पीएचडी करता येईल. एमसीएसारख्या संगणक विषयातील कोर्सला प्रवेश घेऊन आयटी क्षेत्रात काम करणे शक्य आहे. विविध स्पेशलायजेशन्समधील एम.बी.ए.चे शिक्षण घेता येईल.

पदे आणि कार्यक्षेत्रे

स्टॅटिस्टिशियन, बिझनेस ॲनालिस्ट, फायनान्शिअल ॲनालिस्ट, डेटा ॲनालिस्ट, फायनान्शिअल अकाऊंटंट, क्रेडिट कंट्रोल एक्झिक्युटिव्ह, हवामानतज्ज्ञ, मार्केट ॲनालिस्ट, रिसर्च ॲनालिस्ट, ॲक्चुअरी एक्स्पर्ट, डायरेक्टर ऑफ ॲनालिटिक्स आदी पदांवर कार्यरत राहता येते.

सांख्यिकी विभाग, शासकीय संस्था, संशोधन विभाग, आरोग्यविभाग, फायनान्स विभाग, कॉर्पोरेट सेक्टर, हवामान खाते, शेतीविभाग, इन्शुरन्स डिपार्टमेंट, अर्थखाते, नियोजन कक्ष, गुन्हे आणि पोलीस विभाग, बँकिंग सेक्टर, कृषी खाते आदी ठिकाणी सांख्यिकीतज्ज्ञाला संधी उपलब्ध असतात. एम.पी.एस.सी./यू.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय क्षेत्रात जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT