नवी दिल्ली : भारतात येत्या तीन महिन्यात ३८ टक्के खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती प्रक्रिया राबवणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये घसघशीत वाढ होण्याचा अंदाज एका अहवालातून वर्तवण्यात आला आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही खूशखबर आहे. (Good news Big employment opportunities in next three months salary will also increase says report)
'मॅनपावर ग्रुप रोजगार सर्वेक्षण' च्या अहवालानुसार, एप्रिल-जून या तिमाहीत कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याचा अंदाज आहे. या सर्वेक्षणात रोजगार निर्मिसंदर्भात ३,०९० कंपन्यांची मतं जाणून घेण्यात आली. त्यानुसार हा कर्मचारी भरतीबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे, मंगळवारी या अहवालाचं प्रकाशन झालं.
अहवालानुसार, विविध क्षेत्रांची सध्याची स्थिती गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. पण तिमाहीच्या आधारे पाहिल्यास जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत रोजगार निर्मितीत ११ टक्के घट होईल असा अंदाज आहे. एप्रिल-जून तिमाहीसाठी ५५ टक्के कंपन्यांचा अंदाज आहे की, कर्मचाऱ्यांच्या पे रोल मध्येही अर्थात पगारातही वाढ होईल. तर १७ टक्के कंपन्यांनी म्हणणं आहे की पगारात घट होईल तसेच ३६ टक्के कंपन्यांचं म्हणणं आहे की पगारामध्ये कोणताही बदल होणार नाही.
मॅनपावर ग्रुपचे समूह संचालक संदीप गुलाटी म्हणाले, "देश आता कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर येत आहे, पण जागतीक राजकारणातील अस्थिरता आणि वाढती चलनवाढ यांसारखी नवी आव्हानं आपल्या समोर उभी ठाकली आहेत. पण भारत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या रुपात रोजगाराच्या संधी निर्माण होत राहतील.
महिलांचं प्रतिनिधीत्व अद्यापही चिंतेचा विषय
गुलाटी म्हणाले, विविध क्षेत्रात कार्यक्षम महिलांचं प्रतिनिधित्व हा चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये आयटी क्षेत्रात महिलांचं सर्वाधिक प्रमाण आहे जे ५१ टक्के आहे. यानंतर रेस्तराँ आणि हॉटेल क्षेत्रामध्ये ३८ टक्के तर शिक्षण, आरोग्य, समाजकार्य आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचं प्रतिनिधीत्व ३७ टक्के आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.