नोकरी (Job) करायची असेल तर आधी मुलाखत द्यावी लागते. ही मुलाखत कशी होते त्यावरच नोकरी अवलंबून असते. तुम्ही व्यवस्थापकासमोर (Hiring Manager) बसला असला किंवा त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत असाल तर तुमच्या मुलाखती (Job Interview) उत्स्फुर्त होतात.
मुलाखत (Interview) हा नियुक्ती प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग आहे. त्यातून तुमच्या रेझ्युमेमधील (Resume) कौशल्ये दाखवता तर येतातच पण, तुम्ही ज्या संस्थेत काम करणार आहात .त्या संस्थेबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी असते. त्यामुळे मुलाखत ही परीक्षा नाही तर ते तुमच्यातले संभाषण ( conversation) आहे, हे कौशल्य प्रभाव पाडणारे पाहिजे, असे गुगलचे रिक्रुटिंग ग्लोबल हेड ब्रेंडन कॅसल यांनी CNBC मेक इटला सांगितले. नोकरी मिळण्यासाठी चांगली मुलाखत द्यायची असेल तर आधी तयारी करावी लागते. संस्थेविषयी संशोधन करणे, संभाव्य प्रश्नांना तुमचा प्रतिसाद काय असू शकतो त्याचा सराव करणे आणि तुमच्या मुलाखत झाल्यावर जॉबसाठी पाठपुरावा कसा करायचा याचे नियोजन करणे. या तीन मुलाखतीच्या धोरणांचा विचार करून तुम्ही चांगला जॉब मिळवू शकता.
तुम्हाला मुलाखतीचं (Interview) टेन्शन आलंय हे मुलाखतकाराकाला सांगणे सुरवातीला अवघडल्यासारखे वाटू शकते. पण कॅसल म्हणतो की तुमच्या नर्व्हस सिस्टीममुळे मुलाखतीदरम्यान तुम्ही शांत असलात तरी, कठीण प्रश्न विचारले गेले तर तर तुम्ही नर्व्हस होऊ शकता.अशावेळी याच संवादाचा तुम्हाला त्रास होत असेल तर! तुम्ही एक माणूस आहात, तुम्हालाही भावना आहेत, त्यामुळे तुम्हाला मुलाखतीच्या वेळी खरोखर त्रास होत असल्यास, दीर्घ श्वास घेत नम्रपणे तुमच्या मुलाखतकाराला थोडा वेळ देण्यासाठी सांगू शकता. अशावेळी तुम्ही तुम्ही त्यांना सांगू शकता, 'मी थोडा घाबरलो आहे, मी प्रतिसाद देण्यापूर्वी थोडा वेळ घेऊ शकतो का? याविषयी कॅसल म्हणाले की, असे कोणी म्हटले की त्यांच्या विचारांचा आम्ही खरोखर आदर करतो. यातून तुम्हाला या संधीची किती गरज आहे, ही मुलाखत तुमच्यासाठी किती महत्वाची आहे, हे यातून आम्हाला दिसते.
उमेदवारांना कंपनी, त्यांची पॉझिशन काय असेल यासंर्भात सुरूवातीपासूनच प्रश्न विचारण्यासाठी मोकळे आणि सक्षम वाटले पाहिजे. कारण नोकरीचा पुढचा टप्पा गाठताना तुम्ही त्या कंपनीचे मुल्यांकन करत आहात, हे दिसते असे कॅसल म्हणतात. संस्थेच्या प्राधान्यक्रमांचे मोजमाप करण्याठी कॅसल लोकांना कंपनीला तीन प्रश्न विचारण्याचा सल्ला देतात. एखाद्या पदासाठी तुमची यशाची व्याख्या काय असेल?, जेव्हा तुम्ही स्वत:च्या करिअरबाबत, कंपनीबाबत विचार करता तेव्हा त्या प्रवासात तुम्ही स्वत:बद्दल काय शिकलात? कंपनीत दररोज यावे यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि उत्साही वाटेल असे काय आहे? असे प्रश्न विचारा.
तुम्ही मुलाखतीतून जी संधी मिळणार आहे, त्याकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. कॅसल सांगतो की, तुम्ही आधीच्या कंपनीविषयी नकारात्मक बोलू नका. त्या कंपनीतूनही तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतीलच. त्यामुळे त्या कंपनीविषयी थोडा तरी आदर बाळगून त्याविषयी वाईट बोलू नका. त्याऐवजी, सध्याच्या कंपनीत तुम्ही कोणते गुण शोधत आहात हे तुम्ही रिक्रूटरला सांगा. “मुलाखतीदरम्यान पूर्वीच्या कंपनीबद्दल तक्रार करणे ही माझी सर्वात मोठी चूक असू शकते. पण त्या कंपनीची बेसिक माहिती तरी द्या, असे कॅसल सांगतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.