mahavitaran bharti 2024 
एज्युकेशन जॉब्स

Mahavitaran Bharti : महावितरण विभागात सरकारी नोकरीची संधी! कुठे-कसा करावा अर्ज? वाचा सविस्तर

know How to Apply For mahavitaran bharti 2024 : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न खरत असलेल्या तरुणांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न खरत असलेल्या तरुणांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. महावितरण विभागात नोकरीची संधी असून गोंदिया येथील महावितरण विभागात ही भरती केली जाणार आहे. या विवीध पदांसाठी १०वी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, महावितरणकडून ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

महावितरण मध्ये करण्यात येत असलेल्या भरतीदरम्यान उमेदवारांना वायरमन आणि लाइटमन या पदांवरील नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.

पात्रता काय आहे?

गोंदिया येथे होत असलेल्या महावितरण विभागातील या भरतीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास+ ITI पास उमेदवार अर्ज करु शकतात. एकूण ८५ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या पदासाठी भरती गुणवत्ता यादीनुसार केली जाणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आहे. याबाबत उमेदवारांना www.apprenticeshipindia.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावे लागतील.

महावितरणमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे. ज्या तरुणांचे शिक्षण झाले आहे त्यांना कामाचा अनुभव हवा आहे. अशा उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: १८ वर्षीय खेळाडूसाठी मुंबईचा हट्ट; मराठमोळा तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्सकडे

Kolhapur Result : ताकदीने लढा देऊनही 'त्यांना' विजयाची 'तुतारी' फुंकता आली नाही; शरद पवारांसमोर आता मोठं आव्हान!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने मानले ऐश्वर्याचे आभार ; "ती आराध्याजवळ घरी आहे म्हणून..."

MLA Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे वाहतूक कोंडी अन् पाणीप्रश्न सोडविणार

SCROLL FOR NEXT