सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत एसबीआयमध्ये सर्वाधिक 8,544 पदं रिक्त आहेत.
नवी दिल्ली : देशभरातील सरकारी बँकांमध्ये (Government Bank) सध्या 41,177 पदं रिक्त आहेत. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये 8,05,986 पदांपैकी 1 डिसेंबर 2021 पर्यंत 95 टक्के पदं भरली गेली आहेत, तर उर्वरित 5 टक्के पदं अजूनही रिक्त आहेत. बँकांमध्ये रिक्त असलेली 41 हजारांहून अधिक पदं सर्व 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आहेत. या बँकांत स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), पंजाब अॅण्ड सिंध बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), कॅनरा बँक, इंडियन बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिलीय.
पीटीआयच्या वृत्तानुसार, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितलं, की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत एसबीआयमध्ये (SBI Bank) सर्वाधिक 8,544 पदं रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी 3,423 अधिकारी दर्जाची, तर उर्वरित 5121 पदं लिपिक संवर्गातील आहेत. SBI नंतर, पंजाब नॅशनल बँक 6743 रिक्त पदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर, सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 6295 रिक्त जागा, इंडियन ओव्हरसीज बँकेत 5112 आणि बँक ऑफ इंडियामध्ये 4848 रिक्त पदं आहेत.
अर्थमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली, की गेल्या सहा वर्षात पंजाब आणि सिंध बँकेतील एक पद वगळता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये इतर कोणतंही पद किंवा रिक्त जागा रद्द करण्यात आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.