Government Jobs : जर तुम्ही 10 वी पास असाल आणि बराच काळ सरकारी नोकरी शोधत असाल, तर अशा काही संस्था आहेत, ज्या 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देत आहेत.
Government Jobs : जर तुम्ही 10 वी पास असाल आणि बराच काळ सरकारी नोकरी शोधत असाल, तर अशा काही संस्था आहेत, ज्या 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देत आहेत.
त्रिपुरा लोक सेवा आयोगानं (TPSC) त्रिपुरा सरकारच्या GA (SA) विभागांतर्गत त्रिपुरा सचिवालय सेवेच्या (गट C, Non Gazetted) लोअर विभागीय सहाय्यक टंकलेखक, ग्रेड VI या पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून उच्च माध्यमिक 10 वी-12 वी उत्तीर्ण असावा. संगणकाचं मूलभूत ज्ञान, तसेच 40 शब्द प्रति मिनिट या वेगानं संगणकात टाइप करण्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2022 आहे.
आसाम राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळानं आसाम पोलीसमध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार 10 वी-12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी 2022 आहे.
हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशननं (HRTC) कंत्राटी पद्धतीनं 332 पदे भरण्याकरिता ड्रायव्हरच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2021 आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवाराकडं अवजड वाहन चालविण्याचा परवाना असावा.
भारत सरकार संरक्षण मंत्रालय, 762 TPT ASC (सिव्हिल GT) 02 रिक्त जागा भरण्यासाठी सिव्हिल मोटर ड्रायव्हरच्या भरतीकरिता पात्र भारतीय नागरिकांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2021 आहे. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवारच अर्ज करू शकतात.
डिफेन्स इस्टेट यांनी हिंदी टंकलेखक पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी आहे, तर 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) नं आयुष मंत्रालय, GPO कॉम्प्लेक्स, बी ब्लॉक, INA कॉलनी, नवी दिल्ली येथे हाउसकीपिंग स्टाफच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर म्हणजेच आज आहे.
पश्चिम बंगाल पोस्टल सर्कल, कोलकाता यांनी पोस्टल असिस्टंट / शॉर्टिंग असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2021 आहे. 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.
भारत सरकार पोस्ट विभाग, जम्मू आणि काश्मीर पोस्टल सर्कल यांनी क्रीडा कोट्याअंतर्गत पोस्टल असिस्टंट कॅडरमध्ये गुणवंत खेळाडूंच्या थेट भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.
दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती 2021 सरकारी संस्था 10 वी पात्रता असलेल्या पात्र उमेदवारांकडून लोअर विभाग लिपिक पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.
Northern Coalfields Limited नं (NCL) फिटर, इलेक्ट्रिशियन आणि मोटर मेकॅनिक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.