उमेदवार शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
सरकारी नोकरीची (Government Jobs) तयारी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. संरक्षण मंत्रालयाने (Defense Ministry) उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer), कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत एकूण 97 पदांची भरती (Recruitment) केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2022 आहे. शेवटच्या तारखेनंतर मुदत पुन्हा वाढवली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, त्यामुळे वेळेत अर्ज सादर करावा. (Great job opportunities in various positions in the Ministry of Defense)
पात्रता...
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ हिंदी अनुवादकाची 07 पदे, उपविभागीय अधिकाऱ्याची 89 आणि हिंदी टंकलेखकाचे 01 पद भरायचे आहे. याशिवाय, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तर इतर पदांसाठी दहावी उत्तीर्ण असावे. याशिवाय, उमेदवार शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात. अर्ज करण्यापूर्वी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, अर्जाचा फॉर्म नीट वाचावा आणि त्यानुसार अर्ज करावा, कारण फॉर्ममध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
वयोमर्यादा
कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. याशिवाय इतरांसाठी हे वय 18 ते 27 दरम्यान असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
असा करा अर्ज
उमेदवारांना तपशीलवार अधिसूचनेवर उपलब्ध अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून भरावा लागेल. भरलेला अर्ज 'द प्रिन्सिपल डायरेक्टर, डिफेन्स इस्टेट्स, सदर्न कमांड, ईसीएचएस पॉलिक्लिनिक जवळ, कोंडवा रोड, पुणे (Pune) - 411040 वर पाठवावा. तया भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.