bhashaashuddhi book sakal
एज्युकेशन जॉब्स

‘भाषाशुद्धी’चा संकल्प!

गुढीपाडवा कालच झाला आणि आपले नवीन वर्ष सुरू झाले. या मराठी नववर्षानिमित्त आपण सर्वांनीच काही ना काही संकल्प नक्कीच केला असेल, पण एक संकल्प आपण सगळे मिळून करू शकतो.

सकाळ वृत्तसेवा

गुढीपाडवा कालच झाला आणि आपले नवीन वर्ष सुरू झाले. या मराठी नववर्षानिमित्त आपण सर्वांनीच काही ना काही संकल्प नक्कीच केला असेल, पण एक संकल्प आपण सगळे मिळून करू शकतो. तो संकल्प कोणता, हे सांगण्याआधी मी तुम्हाला एका पुस्तकाची माहिती देणार आहे. ते पुस्तक मराठी भाषेसाठी आणि मराठीजनांसाठी फार उपयुक्त ठरले आहे, ते पुस्तक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरलिखित ‘भाषाशुद्धी’!

सावरकरांनी परकीय आक्रमकांच्या भाषेच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या मायमराठीला मुक्त करण्यासाठीदेखील प्रयत्न केले आहेत. अर्थातच, याची प्रेरणा सावरकरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातूनच मिळाली होती. त्या काळात इंग्रजी, फारसी आणि अन्य परकीय भाषांतील अनेक शब्द मराठीमध्ये रूढ झाले होते. अजूनही आपण बऱ्याच प्रमाणात याच भाषांतील शब्द मराठी शब्द समजून वापरतो. त्यामुळेच सावरकरांनी भाषाशुद्धीचा संकल्प केला आणि त्यातून हे पुस्तक साकार झाले.

आज वापरात असलेले दिनांक, महापौर, हुतात्मा, ध्वनिक्षेपक यांसारखे शेकडो शब्द सावरकरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला दिले. परंतु, केवळ प्रतिशब्द देणे हाच त्यांचा उद्देश नाही. कारण बदलत्या काळाप्रमाणे भाषेतही बदल होत जातात. अशावेळी आपल्या भाषेतून नवे शब्द कसे तयार करता येतील? ते तयार करत असताना कोणती पथ्ये पाळावीत? नवीन शब्द रूढ करण्यासाठी काय करावे? यावरदेखील सावरकरांनी तर्कशुद्ध मार्गदर्शन केले आहे.

या पुस्तकाच्या मागील पानांवर सावरकरांनी सध्या आपण वापरत असणाऱ्या अनेक इंग्रजी आणि फारसी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्दही दिलेले आहेत. त्यामुळे मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे आणि त्यात दिलेल्या मराठी प्रतिशब्दांचा वापर अत्यंत आग्रहाने आपल्या दैनंदिन जीवनात करायला हवा. याच निमित्ताने आपण एक संकल्प करूया की, रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांना सुटसुटीत असे मराठी प्रतिशब्द शोधूया आणि दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करूया.

(संकलन : रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Chh.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT