sakal sakal
एज्युकेशन जॉब्स

मनोरंजन करणाऱ्या मार्गदर्शनपर गोष्टी

‘गोष्ट’ ही एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऐकायला आवडते. त्यामुळेच तर आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून गहन तत्त्वज्ञान किंवा सनसनावळ्यांच्या साखळदंडात अडकलेला इतिहास हा कथांच्या स्वरूपात रंगवून सांगितला गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘गोष्ट’ ही एक अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऐकायला आवडते. त्यामुळेच तर आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून गहन तत्त्वज्ञान किंवा सनसनावळ्यांच्या साखळदंडात अडकलेला इतिहास हा कथांच्या स्वरूपात रंगवून सांगितला गेला आहे. तत्त्वज्ञानातील जड सिद्धांतांचा उलगडादेखील गोष्टींच्या माध्यमातून अगदी सहज होतो. हीच बाब लक्षात घेऊन दीप त्रिवेदी यांनी ‘१०१ सुरस गोष्टी’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.

या पुस्तकातील काही कथा या नव्या आहेत, तर काही पूर्वापार सांगण्यात आलेल्या कथा नव्या स्वरूपात आणि नव्या संदर्भात मांडण्यात आल्या आहेत. दैनंदिन जीवनातील समस्यांचे मूळ आपल्या अंतरंगात म्हणजेच आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत, आपल्या वागण्यात किंवा आपल्या समजुतीतदेखील असते. त्यामुळे आपल्या अंतरंगात सुधारणा केली असता, अनेक समस्या दूर होण्याची हमी हे पुस्तक आपल्याला देते.

या पुस्तकात केवळ मनोरंजनासाठी म्हणून सुरस गोष्टी देण्यात आलेल्या नाहीत तर, या गोष्टींच्या माध्यमातून मानसशास्त्रातील अनेक सिद्धांत कथा स्वरूपात, सोपे करून मांडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक कथेनंतर त्या कथेचे आजच्या संदर्भात नेमके तात्पर्य काय आहे? हेदेखील लेखकाने दिले आहे. पुस्तकातील भाषा अत्यंत सोपी आहे. लेखकाने निवडलेल्या कथा रंजक असल्याने केवळ तात्पर्य देण्यासाठी कथेची जुळवाजुळव केली आहे, असे अजिबात वाटत नाही. या कथांमध्ये साधुसंतांच्या, शास्त्रज्ञांच्या, समाजसुधारकांच्या कथा आहेत. या कथांना देश आणि कालाचे मात्र मुळीच बंधन नाही. भगवान बुद्ध, महावीर, रामकृष्ण परमहंस, गॅलिलिओ यांसह विविध ख्रिस्ती आणि सुफी संतांच्या शिकवणीचा समावेश कथांमध्ये करण्यात आला आहे.

एकदा रामकृष्ण परमहंस यांना भेटायला एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने रामकृष्ण परमहंस यांना सांगितले की, मी अनेक वर्षे तपश्चर्या करून पाण्यावर चालण्याची सिद्धी मिळवली आहे. तुम्ही तर एवढे मोठे संत आहात, तुम्हालाही हे सहज जमतच असेल. रामकृष्ण परमहंस यांनी मात्र त्यांना अशी कोणतीही सिद्धीप्राप्त झाली नसल्याचे त्याला सांगितले. त्यामुळे मनुष्य गर्वाने फुगून स्वतःला परमहंस यांच्या पेक्षा मोठा समजू लागला. यावर परमहंस यांनी त्याला आयुष्यभर लक्षात राहील अशी शिकवण अगदी साध्या कृतीतून दिली. परमहंस यांनी नेमका कोणता बोध दिला? हे जाणून घेण्यासाठी व यांसारख्या अनेक रंजक गोष्टींमधून आपल्यात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी ‘१०१ सुरस गोष्टी’ हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.

(संकलन : रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT