मुंबई : भारतात, उत्पन्नाच्या बाबतीत तरुणांसाठी प्रथम प्राधान्य नोकरी आहे, ते चांगल्या नोकरीसाठी शालेय शिक्षण घेतल्यानंतर कठोर परिश्रम करू लागतात.
आज जेव्हा तुम्ही बहुतेक तरुणांना विचाराल की देशातील सर्वोत्तम आणि सर्वाधिक पगाराची नोकरी कोणती आहे, तेव्हा त्यांचे उत्तर असेल आयएएस किंवा पीसीएस. पण तसे नाही.
सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत त्या चांगल्या असतील, पण पगाराच्या बाबतीत देशात एकापेक्षा एक नोकऱ्या उपलब्ध आहेत. या नोकऱ्या करून तुम्ही काही वर्षांतच कोट्यधीश व्हाल. (High Salary Jobs in india how to be millionaire which job can give me high salary best job opportunity) हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी ?
डेटा सायंटिस्ट
डेटा सायंटिस्टची नोकरी करणाऱ्यांना कामाचे दडपण असते, पण पगार इतका असतो की तुम्ही तुमचे आयुष्य ऐषोरामात घालवू शकता. भारतात डेटा सायंटिस्टच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांना किमान ९ ते १० लाख वार्षिक पगाराची नोकरी मिळते.
काही काळानंतर, म्हणजे थोड्या अनुभवानंतर, हा पगार २० ते ३० लाख रुपये होतो. तुम्हाला डेटा सायंटिस्ट व्हायचे असेल तर आधी इंजिनीअरिंग आणि नंतर डेटा सायन्सचा स्पेशल कोर्स करावा लागेल.
इन्व्हेस्टमेंट बँकर
इन्व्हेस्टमेंट बँकरची नोकरी ही अतिशय जबाबदारीची नोकरी आहे. ही नोकरी करायची असेल तर वाणिज्य शाखेतून शिक्षण घ्यावे लागेल. या नोकरीमध्ये तुम्हाला आधी १० ते १२ लाख रुपये पगार मिळेल आणि नंतर तो ३० ते ४० लाख रुपये होईल. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचे असेल तर चांगल्या महाविद्यालयातून एमबीएची पदवी घ्यावी लागते.
सॉफ्टवेअर आर्किटेक्ट
तुम्ही आत्तापर्यंत सॉफ्टवेअर इंजिनीअरबद्दल ऐकले असेल किंवा घरे, इमारती आणि सर्व प्रकारच्या नागरी प्रकल्पांचे नकाशे आणि डिझाइन बनवणाऱ्या आर्किटेक्टबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण सॉफ्टवेअर आर्किटेक्ट या दोघांपेक्षा वेगळा आहे.
सॉफ्टवेअर आर्किटेक्ट होण्यासाठी तुम्हाला बी.टेक, विशेषतः कॉम्प्युटर सायन्समध्ये करावे लागेल. सॉफ्टवेअर आर्किटेक्टचे काम नवीन सॉफ्टवेअर विकसित करणे आणि नवीन अॅप्स तयार करणे आहे. त्यांचा सुरुवातीचा पगार १५ ते २० लाख रुपये आहे, जो काही काळानंतर ५० लाखांहून अधिक होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.