Online Portal for Certificate Applications: Save Time and Avoid Multiple Visits esakal
एज्युकेशन जॉब्स

Documents for Certificates : कोणता दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे महत्वाची;जाणून घ्या सविस्तर माहिती

Maha E-Seva : शैक्षणिक कामांसाठी प्रमाणपत्रांची वाढली मागणी, ‘सेतू’मधून वितरित होतात रोज आठशेवर प्रमाणपत्रे

Saisimran Ghashi

E-Seva Certificates : शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशाला सुरवात झालेली आहे. पाल्यांच्या प्रवेशासाठी दर्जेदार शाळा-महाविद्यालयांचा शोध पालकवर्ग घेत आहे. तसेच ज्यांचे पाल्य शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकतात, त्यांची नव्या वर्षाच्या तयारीसाठी धावपळ सुरू आहे. सध्या शैक्षणीक कागदपत्रांची तजवीज करण्यासाठी पालकांची सेतू सुविधा केंद्रामध्ये गर्दी वाढू लागली आहे.

सध्या या केंद्रातून रोज ८०० ते ८५० विविध प्रमाणपत्रे वितरीत केली जात आहेत. तथापि, कोणते प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, ती कशी मिळवावीत, याची सविस्तर माहिती. (How to get certificates from E-Seva/Setu)

जात प्रमाणपत्र (Caste Certificate)

टीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०, १२), जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी तसेच अशिक्षित असल्यास तसा दाखला, रहिवासी दाखला कोणताही एक, रेशन कार्ड, घरटॅक्स पावती चालू व १५ वर्षांपूर्वीची, सात बाराचा उतारा व गाव नमूना - ८, पाच नातेवाईकांचे जातीचे प्रमाणपत्र, वंशावळी, आधार कार्ड , पासपोर्ट फोटो, जातीची नोंद असल्याचा पूरावा ( अनुसूचित जाती, जमातीसाठी १९५० पूर्वीचा, ओबीसीसाठी १९६७ पूर्वीचा तर भटकी जमात ब,क,ड साठी १९६१ पूर्वीचा)

सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेली असावीत.

किती दिवसांत मिळणार प्रमाणपत्र ः

४५ दिवसांत

वय-राष्ट्रीयत्व-अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)

टीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०,१२) , जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी तसेच अशिक्षित असल्यास तसा दाखला, रहिवासी दाखला कोणताही एक, रेशन कार्ड, घरटॅक्स पावती चालू व १५ वर्षांपूर्वीची, ग्रामपंचायत गाव नमुना - ८, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, स्थलांतरीत व्यक्ती असल्यास बाॅर्डस सर्टीफिकेट.

सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेली असावित.

किती दिवसांत मिळणार प्रमाणपत्र ः १५ दिवसांत.

दहा टक्के आरक्षणाचे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (EWS Certificate)

टीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०, १२), जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी किंवा अशिक्षित असल्यास तसा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, तीन वर्षांचे तहसीलदारांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (कोणताही एक), रेशन कार्ड, घरटॅक्स पावती चालू व १५ वर्षांपूर्वीची, ग्रामपंचायत गाव नमुना -८, सातबारा, नमुना-८ अ, आधार कार्ड ,पासपोर्ट फोटो.

सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेले असावेत.

किती दिवसात मिळणार प्रमाणपत्र ः ७ दिवसात.

नॉनक्रिमीलेयर सर्टिफिकेट (Non-Creamylayer)

टीसी, बोनाफाईड सर्टिफीकेट (४, १०, १२), जन्म प्रमाणपत्र, वडीलांची टीसी किंवा अशिक्षित असल्यास तसा दाखला, तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (नॉन क्रिमीलेयर व सेंट्रल कास्टसाठी), रहिवासी दाखला (कोणताही एक), स्वतःचे जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो. जातीची नोंद असल्याचा जातदर्शक पुरावा. (अनुसूचित जाती, जमातीसाठी १९५० पूर्वीचा, ओबीसीसाठी १९६७ पूर्वीचा तर भटकी जमात ब, क, ड (एनटी) साठी १९६१ पूर्वीचा)

सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकीत केलेली असावीत.

किती दिवसांत मिळणार प्रमाणपत्र ः

२१ दिवसात.

उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)

ओळखीसाठी ः आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक.

पत्ता पुरावा ः वीज बिल, रेशनकार्ड, टेलीफोन बील, मालमत्ता कर भरल्याची पावती, पाणीपट्टी भरल्याची पावती, नमुना आठ, वाहन चालवण्याचा परवाना, आधार कार्ड,पासपोर्ट, निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र यापैकी एक.

नोकरदार असल्यास आयटी रिटर्न दाखल केल्याचा पुरावा

किती दिवसांत मिळणार मिळते ः १५ दिवसात

रहिवासी प्रमाणपत्र

आधार कार्ड, टीसी

किती दिवसात ः सात दिवसात

सेतूच्या चकरा माराव्या लागणार नाहीत

महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. केंद्रचालक नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो आणि नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडचणीशिवाय घेऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी त्यांना लांबच लांब रांगा लावायची गरज नाही.

यासाठी शासनाकडून https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ऑनलाईन सेवेसाठी हे पोर्टल देण्यात आले असून या पोर्टलवर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी कार्यालयात असंख्य फेऱ्याही माराव्या लागत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT