सध्या शाळा कॉलेज प्रवेशाची धामधूम सुरू आहे. विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही कागदपत्रं गोळा करण्याच्या लगबगीत आहेत. तसंच विविध स्पर्धा परिक्षांचे फॉर्मही भरण्याची लगबग सुरू आहे. या सगळ्यासाठी लागणारं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र. डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणजे वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.
तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, याचं हे प्रमाणपत्र असतं. जे तुम्हाला शाळा कॉलेजच्या अॅडमिशनमध्ये लागणारच आहे. हे प्रमाणपत्र कसं काढायचं, त्याची प्रक्रिया काय आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, या सगळ्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. या प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे.
ओळखपत्र - (किमान १)
पॅन कार्ड
पासपोर्ट
आधार कार्ड
मतदान ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
कोणतंही सरकारी ओळखपत्र
रहिवासी पुरावा - (किमान १)
पासपोर्ट
पाणी बिल
रेशन कार्ड
आधार कार्ड
मतदान ओळखपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स
वीज बिल
प्रॉपर्टी टॅक्सची पावती
७/१२चा उतारा आणि ८ अ भाड्याची पावती
इतर कागदपत्रं
पाणी बिल
रेशन कार्ड
भाडेपट्टी (भाडेकरार)
लग्नाचं प्रमाणपत्र
नवऱ्याचा रहिवासी दाखला
अर्जदार अल्पवयीन असल्यास
SFC प्रमाणपत्र
बोनाफाईड प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
वडिलांचं डोमिसाईल प्रमाणपत्र
तलाठ्याचा रहिवासी दाखला
ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला
aaplesarkar.mahaonline.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. या प्रमाणपत्राबद्दल काही शंका असल्यास तुम्ही तुमच्या भागातल्या तहसीलदाराशी संपर्क साधू शकता. डोमिसाईल प्रमाणपत्र मिळण्यासाठी साधारण १५ दिवसांचा कालावधी लागतो. राज्य सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याबद्दलची अधिक माहितीही मिळवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.