IDBI Bank Job Notification : बँकेत नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयडीबीआय बँकेमध्ये ज्यूनिअर असिस्टंट, मॅनेजर ग्रेड ओ आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याठिकाणी तब्बल 2,100 जागा रिक्त आहेत.
यामधील 800 जागा या ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर आणि 1,300 जागा या सेल्स आणि ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी आहेत. यासाठी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया आजपासून (22 नोव्हेंबर) सुरू झाली आहे. अर्जाची शेवटची तारीख 6 डिसेंबर आहे.
एक्झिक्युटिव्ह पदासाठी 30 डिसेंबर रोजी परीक्षा पार पडणार आहे. तर, ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 31 डिसेंबर रोजी परीक्षा पार पडणार आहे. या तारखांमध्ये बदल झाल्यास आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर त्याबाबत माहिती देण्यात येईल. (Career News)
ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बॅचलर्स डिग्री (कमीत कमी 60 टक्के मार्क) असणं गरजेचं आहे. SC/ST/PwBD या प्रवर्गातील उमेदवारांना 55 टक्के मार्क असणं गरजेचं आहे.
यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 2 नोव्हेंबर 1998 ते 1 नोव्हेंबर 2003 या कालावधी मध्येच झालेला असायला हवा. या पदासाठी 6.14 लाख ते 6.50 लाख रुपये (सीटीसी) एवढा वार्षिक पगार मिळेल.
एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएट असायला हवी. या पदासाठी पहिल्या वर्षी 29,000 रुपये प्रति महिना; तर दुसऱ्या वर्षी 31,000 रुपये प्रति महिना एवढा पगार मिळेल.
आयडीबीआय भरतीची नोटिफिकेशन पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. तसंच, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.