इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जुलै 2021 सत्रात प्रवेशासाठी नोंदणीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे.
सोलापूर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (Indira Gandhi National Open University - IGNOU) (इग्नू) जुलै 2021 सत्रात प्रवेशासाठी नोंदणीची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. 'इग्नू'च्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भात एक छोटी सूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे, की यूजी आणि पीजी प्रोग्राम (प्रमाणपत्र आणि सेमिस्टर आधारित कार्यक्रम वगळता) प्रवेशासाठी प्रवेश पोर्टल 23 सप्टेंबरपर्यंत खुले राहील. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख 15 सप्टेंबर होती. ज्या उमेदवारांना यूजी किंवा पीजी प्रोग्राममध्ये ओडीएल किंवा ऑनलाइन मोडमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
या स्टेप्सनुसार करा अर्ज
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम इग्नूच्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in ला भेट देणे आवश्यक आहे. पुढे मेन पेजवर उपलब्ध ऑनलाइन प्रवेश पोर्टल जुलै 2021 सत्र या लिंकवर क्लिक करा. आता तुम्ही एका नवीन पेजवर याल. येथे तुम्हाला ओडीएल मोड प्रोग्राम आणि ऑनलाइन मोड प्रोग्रामसाठी प्रवेश पोर्टलची स्वतंत्र लिंक दिसेल. आता संबंधित लिंकवर क्लिक करा. आता पुन्हा एक नवीन पेज उघडेल. येथे न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करून विनंती केलेली माहिती भरा आणि नोंदणी करा. आता तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळेल. आपले वापरकर्ता नाव आणि पासवर्डद्वारे लॉगइन करा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
इग्नूने जुलै 2021 सत्रात प्रवेशासाठी नोंदणीची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली आहे. त्याचवेळी जुलै 2021 सत्रासाठी पुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर रोजी संपली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे, की जुलै 2021 सत्रासाठी अधिकृत वेबसाइटवर पुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया 5 मे 2021 पासून सुरू झाली. त्यानंतर पुन्हा नोंदणीची शेवटची तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली. सुरवातीला शेवटची तारीख 15 जून 2021 होती, ती पुढे 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर पुन्हा नोंदणीची शेवटची तारीख अनेक वेळा वाढवण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.