10 Board Exam News  sakal
एज्युकेशन जॉब्स

10 Board Exam News : दहावी परीक्षेच्या शुल्कात वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यानुसार दहावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मुख्य परीक्षा-२०२५ या दोन्हीसाठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे.

राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्यांना ४७० रुपये परीक्षा शुल्क, २० रुपये प्रशासकीय शुल्क, २० रुपये गुणपत्रिका लॅमिनेशनसह शुल्क, २० रुपये प्रमाणपत्र शुल्क, १० रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय), १०० रुपये प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र शिक्षण), १३० रुपये खासगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह), खासगी विद्यार्थी नोंदणी शुल्क एक हजार २१० रुपये, असे शुल्क आकारले जाणार आहे.

पुनर्परीक्षार्थी आणि तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढीव शुल्काचा तपशील राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याप्रमाणे श्रेणी सुधारण्यासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कातही वाढ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Election : पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील पराभूत कसे पराभूत झाले ? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

Krishna Khopde : पूर्व नागपुरात ‘कृष्ण कमळ’ ला तोड सापडेना, सलग चौथ्यांदा विजय : कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादीही हतबल

Rahul Kul: आमदार राहुल कुल यांची अनोखी हॅटट्रीक; मंत्रीपदाचा वनवास कधी संपणार?

SCROLL FOR NEXT