Lieutenant General BS Raju esakal
एज्युकेशन जॉब्स

'2032 पर्यंत सैन्यात 50 टक्के 'अग्निवीर' असणार, दरवर्षी दीड लाख तरुणांची होणार भरती'

सकाळ डिजिटल टीम

सैन्यदलात सेवा करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणाईसाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय.

नवी दिल्ली : सैन्यदलात सेवा (Indian Army Recruitment) करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुणाईसाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. सरकारनं टूर ऑफ ट्युटी (Tour Of Duty) सिस्टमची घोषणा केलीय. त्याला 'अग्निपथ' असं नाव दिलंय. या नव्या व्यवस्थेअतर्गंत सैन्यदलात भरती होणाऱ्या युवकांना 'अग्निवीर' या नावानं ओळखलं जाणार आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गंत (Agneepath Scheme) सैन्यदलात सैनिकांची भरती चार वर्षांपर्यंत होणार आहे. चार वर्षांनंतर त्या जवानांना १० लाख रुपये मिळणार आहेत. अग्निवीरांना त्यांच्या कार्यकाळानंतर प्रशस्तीपत्रक व डिप्लोमा देण्यात येईल. या नव्या व्यवस्थेनुसार भू-दल, वायू- दल आणि नौदलात प्रत्येक वर्षी 45,000 ते 50,000 जणांची अधिकारी पदाच्या खाली नियुक्ती करण्याची योजना आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू (Lieutenant General BS Raju) यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, अग्निपथ योजनेमुळं आगामी काळात लष्करीची ताकद वाढणार आहे. सरकारच्या या योजनेनुसार 2030-32 पर्यंत 12 लाख लष्करी जवानांपैकी निम्मे 'अग्नवीर' असतील. या योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना 'अग्निवीर' असं नाव देण्यात आलंय.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लेफ्टनंट जनरल बीएस राजू पुढं म्हणाले, 'या योजनेअंतर्गत दरवर्षी भरतीची संख्या वाढवली जाईल. यावर्षी 40 हजार तरुणांचा यात समावेश होणार आहे. सातव्या आणि आठव्या वर्षापर्यंत त्याची संख्या 1.2 लाखांपर्यंत पोहोचेल. तर, दहाव्या आणि अकराव्या वर्षी ही संख्या 1.6 लाखांवर पोहोचेल.' या योजनेअंतर्गत यंदा हवाई दल आणि नौदलात 3000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार आहे. मात्र, वर्षानुवर्षे भरतीचं प्रमाण वाढणार आहे. अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील केवळ 25 टक्के चांगल्या सैनिकांना पुढील 15 वर्षांसाठी नियमित केडरमध्ये सामील करून घेतलं जाईल. तर, उर्वरित 75 टक्के चार वर्षांनंतर काढले जातील.

लष्कराचं सरासरी वय वाढेल

लष्कर उपप्रमुख बीएस राजू यांच्या मते, या योजनेमुळं लष्कराचा फिटनेस वाढणार आहे. सध्या लष्करात सरासरी वय 32 वर्षे आहे. परंतु, अग्निवीरांच्या भरतीनंतर 6-7 वर्षांनी हे सरासरी वय 24-26 वर्षांपर्यंत खाली येईल. या योजनेतून भरती झाल्यानंतर तरुणांचा सैन्यातील उत्साह आणि जोश कमी होऊ शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. कारण, त्यांची भरती केवळ चार वर्षांसाठी असणार आहे. देशात बेरोजगारी वाढू शकते, असंही काही लोक म्हणत आहेत. किंबहुना, दर चार वर्षांनी सुमारे ७५ टक्के तरुणांना कामावरून कमी केलं जाईल. मात्र, बीएस राजू या दाव्यांचं खंडन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT