इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज सारख्या भारतीय आयटी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत यूएसमध्ये भरती वाढवली आहे.
सोलापूर : भारतीय IT कंपनी HCL Technologies अमेरिकेत (America) 12 हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. कंपनी पुढील पाच वर्षात या लोकांना नोकरीच्या (Jobs) संधी देणार आहे. यापैकी सुमारे दोन हजार लोकांना येत्या दीड वर्षात एचसीएलमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
'Rise At HCL' चा कार्यक्रम
याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, ही नियुक्ती अमेरिकेतील स्थायिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 'Rise At HCL' या कार्यक्रमाचा एक भाग आहे. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज सारख्या भारतीय आयटी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत यूएसमध्ये भरती वाढवली आहे. अमेरिकन नोकऱ्या आउटसोर्स केल्याच्या वृत्ताला चुकीचे असल्याचे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.
फ्रेशर्सना प्रशिक्षण देण्यावर भर
एचसीएल टेक्नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी सी. विजयकुमार म्हणाले की, एचसीएलचा Rise At HCL कार्यक्रम फ्रेशर्सना प्रशिक्षण देण्यावर केंद्रित आहे. यामध्ये फ्रेशर्सना जॉब लर्निंगपासून सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटपर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. या कार्यक्रमाद्वारे, आम्ही नुकतेच पदवीधर झालेल्या किंवा लवकरच पदवीधर होणाऱ्या तरुणांना एचसीएलमध्ये काम करण्यासाठी तयार करू.
या राज्यांवर राहील भर
एचसीएल या कार्यक्रमाद्वारे ऍप डेव्हलपमेंट, क्लाउड, आयटी इन्फ्रा सर्व्हिसेस, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा ऍनालिटिक्स आणि डिजिटल इंजिनिअरिंग यांसारख्या पदांसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. ही नियुक्ती अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना (North Carolina), टेक्सास (Texas), कॅलिफोर्निया (California), मिशिगन (Michigan), पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania), मिनेसोटा (Minnesota) आणि कनेक्टिकट (Connecticut) या राज्यांमध्ये केंद्रित केली जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.